देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
अपेक्षेप्रमाणे करता येत नसलं तरी आनंदी राहा
दावीदला यहोवासाठी एक सुंदर मंदिर बांधायची मनापासून इच्छा होती (१इत १७:१, २; टेहळणी बुरूज०६ ८/१ १२ ¶१)
पण यहोवाने त्याला सांगितलं, की मंदिर बांधायचं काम त्याला करता येणार नाही (१इत १७:४)
दावीदला मंदिर बांधता आलं नाही, तरी यहोवाने त्याला दिलेल्या कामात तो व्यस्त राहिला (१इत १७:७; १८:१४)
तुम्हाला जरी वाढत्या वयामुळे, आरोग्याच्या समस्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे काही ठराविक जबाबदाऱ्या पार पाडता येत नसल्या, तरी तुम्हाला ज्या गोष्टी करणं शक्य आहे, त्या करण्यात व्यस्त राहा.—प्रेका १८:५; टेहळणी बुरूज२१.०८ २२-२३ ¶११.