ख्रिस्ती जीवन
आपल्या मुलांना शिकवताना बायबल तत्त्वांचा वापर करा
आपल्या मुलांनी यहोवाच्या सेवेत एक चांगलं आणि आनंदी जीवन जगावं असं ख्रिस्ती पालकांना नेहमीच वाटतं. त्यासाठी ते बायबल तत्त्वांचा वापर करून आपल्या मुलांना प्रशिक्षण देऊ शकतात आणि त्यांना यशस्वी व्हायला मदत करू शकतात.—नीत २२:६.
-
मुलांना तुमच्यासोबत मनमोकळेपणाने बोलता येईल असं वातावरण ठेवा.—याक १:१९
-
मुलांसमोर चांगलं उदाहरण ठेवा.—अनु ६:६
-
नियमितपणे उपासनेशी संबंधित गोष्टी करत राहा.—इफि ६:४
टिकून राहील असं घर बांधा—मुलांना योग्य मार्गावर चालण्याचं शिक्षण द्या हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
पालक आपल्या मुलांशी वागताना समजूतदारपणा कसा दाखवू शकतात?
-
याकोब १:१९ मध्ये दिलेलं तत्त्व पालक कसं लागू करू शकतात?
-
समस्या निर्माण होतात तेव्हा पालक काय करू शकतात?