व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

परीक्षांचा सामना करत असताना यहोवा आपल्याला मदत करतो

परीक्षांचा सामना करत असताना यहोवा आपल्याला मदत करतो

या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला बऱ्‍याच कठीण परीक्षांचा सामना करावा लागत आहे. कधीकधी या परीक्षा आपल्या सहनशक्‍तीच्या पलीकडे आहेत असं कदाचित आपल्याला वाटेल. पण आपण यहोवासोबतचं आपलं नातं घट्ट केलं तर अतिशय वाईट परीक्षांमध्येसुद्धा टिकून राहायला तो आपल्याला मदत करेल. (यश ४३:२, ४) मग परीक्षांचा सामना करत असताना आपण यहोवासोबतचं आपलं नातं आणखी मजबूत कसं करू शकतो?

प्रार्थना. आपण जेव्हा यहोवासमोर आपलं मन मोकळं करतो तेव्हा तो आपल्याला मनाची शांती आणि समस्यांचा सामना करण्यासाठी लागणारी ताकद देतो.​—फिलि ४:६, ७; १थेस ५:१७.

सभा. सभांमध्ये यहोवा पुरवत असलेल्या आध्यात्मिक अन्‍नाची आणि ख्रिस्ती सहवासाची आज आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे. (इब्री १०:२४, २५) आपण जेव्हा सभांची तयारी करतो, त्यांत उपस्थित राहतो आणि सहभाग घेतो तेव्हा यहोवाच्या पवित्र शक्‍तीचा आपल्याला फायदा होत असतो.​—प्रक २:२९.

प्रचारकार्य. आपण जर प्रचारकार्यात व्यस्त राहिलो आणि त्यात पुरेपूर सहभाग घेतला तर आपल्याला चांगल्या गोष्टींवर लक्ष लावायला सोपं जाईल. याशिवाय आपल्या भाऊबहिणींसोबत आणि यहोवासोबत असलेलं आपलं नातं आणखी मजबूत होईल.​—१कर ३:५-१०.

यहोवा तुम्हाला स्वीकारेल,  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • परीक्षांचा सामना करत असताना कोणत्या गोष्टीमुळे मालूला यहोवासोबतचं आपलं नातं टिकवून ठेवायला मदत झाली?

  • मालूप्रमाणेच, परीक्षांमधून जात असताना स्तोत्र ३४:१८ मधले शब्द आपल्याला कसं सांत्वन देतात?

  • परीक्षांचा सामना करत असताना यहोवा आपल्याला “असाधारण सामर्थ्य” देतो हे मालूच्या उदाहरणातून कसं दिसून येतं?​—२कर ४:७