देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवाच्या मदतीने तुम्ही कठीण जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडू शकता
लेवी वंशातल्या द्वारपालांवर खूप मोठी जबाबदारी होती (१इत ९:२६, २७; टेहळणी बुरूज०५ १०/१ ९ ¶८)
मोशेच्या काळात फिनहास हा छावणीच्या द्वारपालांचा प्रमुख होता (१इत ९:१७-२०क)
यहोवाने फिनहासला त्याची जबाबदारी पूर्ण करायला मदत केली (१इत ९:२०ख; टेहळणी बुरूज११ ९/१५ ३२ ¶७)
यहोवाने आपल्यावर बरीच महत्त्वाची कामं सोपवली आहेत. आपली जबाबदारी कशी पार पाडायची याबद्दल आपल्याला जराही शंका असेल, तर आपण यहोवाला प्रार्थना केली पाहिजे आणि एखाद्या प्रौढ ख्रिस्ती भावाची किंवा बहिणीची मदत घेतली पाहिजे.—फिलि २:१३.