व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

यहोवाची विचारसरणी जाणून घ्यायचा प्रयत्न करा

यहोवाची विचारसरणी जाणून घ्यायचा प्रयत्न करा

आपण जे काही करू त्यामुळे यहोवाचं मन आनंदित व्हावं अशी आपली इच्छा असते. (नीत २७:११) त्यासाठी कोणतीही गोष्ट करताना आपल्याला यहोवाच्या विचारसरणीनुसार निर्णय घ्यावे लागतील. अगदी अशा गोष्टींच्या बाबतीतसुद्धा ज्याबद्दल बायबलमध्ये स्पष्ट नियम दिलेले नाहीत. मग त्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

नियमितपणे बायबलचा अभ्यास करत राहा. आपण जेव्हा बायबल वाचत असतो तेव्हा खरंतर आपण यहोवासोबत वेळ घालवत असतो. बायबल वाचत असताना यहोवा आपल्या लोकांशी कसा वागला ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. यासोबतच त्याच्या नजरेत ज्यांनी चांगली आणि वाईट कामं केली त्यांच्या उदाहरणांकडेही लक्ष द्या. असं केल्यामुळे आपल्याला यहोवा कसा विचार करतो ते समजेल. आणि मग जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येईल, तेव्हा यहोवाची पवित्र शक्‍ती आपल्याला बायबलमधून शिकलेले महत्त्वाचे धडे आणि त्यातली तत्त्वं आठवायला मदत करेल.​—योह १४:२६.

संशोधन करा. निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा स्वतःला विचारा, ‘याबाबतीत यहोवा कसा विचार करतो हे समजून घ्यायला बायबलचे कोणते अहवाल आणि वचनं मला मदत करतील?’ यहोवाने तुम्हाला मदत करावी म्हणून प्रार्थना करा. आणि तुमच्या परिस्थितीला लागू होतील अशी तत्त्वं शोधण्यासाठी तुमच्या भाषेत उपलब्ध असलेल्या संशोधनाच्या साधनांचा वापर करा.—स्तो २५:४.

जीवनाच्या शर्यतीत धीराने धावण्याची गरज आहे​—पौष्टिक आहार घ्या  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • व्हिडिओमध्ये दाखवलेल्या तरुण बहिणीला कोणत्या दबावांचा सामना करावा लागला?

  • अशा प्रकारच्या दबावांचा सामना करण्यासाठी तुम्ही संशोधनाच्या साधनांचा वापर कसा करू शकता?

  • योग्य निर्णय घेण्यासाठी संशोधन आणि वैयक्‍तिक अभ्यास करायला आपण वेळ काढतो तेव्हा आपल्याला कसा फायदा होतो?​—इब्री ५:१३, १४