व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

स्मारकविधीच्या काळात आपली सेवा वाढवण्यासाठी ध्येयं ठेवा

स्मारकविधीच्या काळात आपली सेवा वाढवण्यासाठी ध्येयं ठेवा

यहोवाचे लोक दर वर्षी होणाऱ्‍या स्मारक विधीला सोबत मिळून उपस्थित राहायची वाट पाहत असतात. स्मारकविधीच्या आधीच्या आणि नंतरच्या आठवड्यात खंडणीच्या सुंदर भेटीबद्दल यहोवाची स्तुती करण्याची आणि त्याचे आभार मानण्याची खास संधी आपल्याकडे असते. (इफि १:३, ७) उदाहरणार्थ, आपण लोकांना स्मारकविधीचं आमंत्रण देण्यासाठी खूप मेहनत घेतो. काही जण मार्च आणि एप्रिल महिन्यादरम्यान ३० किंवा ५० तासांची साहाय्यक पायनियर सेवा करण्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी योग्य ते फेरबदल करतात. या वर्षी होणाऱ्‍या स्मारकविधीच्या काळात तुम्हालाही तुमची सेवा वाढवायची इच्छा आहे का? मग त्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

आधीपासून चांगली योजना केली तर आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे सेवा करता येईल. (नीत २१:५) त्यामुळे लवकरच येणाऱ्‍या स्मारकविधीसाठी आपण आत्तापासूनच तयारी केली पाहिजे. म्हणून स्मारविधीच्या काळात सेवा वाढवण्यासाठी आणि तुम्ही ठेवलेली ध्येयं गाठण्यासाठी तुम्हाला काय करता येईल याचा विचार करा. आणि मग तुमच्या प्रयत्नांवर यहोवाने आशीर्वाद द्यावा म्हणून त्याला प्रार्थना करा.​—१यो ५:१४, १५.

स्मारकविधीच्या काळात तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी आपली सेवा वाढवू शकता?