देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
काळाची गरज ओळखा
कित्येक वर्ष यहोवा यहूदाच्या लोकांना इशारा देत राहिला, की त्यांनी जर आपली दुष्ट कामं सोडली नाहीत तर तो त्यांना आपल्या नजरेसमोरून दूर करेल (२रा २४:२, ३; टेहळणी बुरूज०१ २/१५ १२ ¶२)
यहोवाने इ.स.पू. ६०७ मध्ये यरुशलेमचा नाश करण्यासाठी बाबेलचा वापर केला (२रा २५:८-१०; टेहळणी बुरूज०७ ४/१ ११ ¶१०)
पण ज्यांनी यहोवाच्या इशाऱ्यांकडे लक्ष दिलं, त्यांचा त्याने नाश होऊ दिला नाही (२रा २५:११)
गेल्या कित्येक दशकांपासून यहोवा जगातल्या सर्व लोकांना इशारा देत आला आहे, की तो ‘दुष्ट लोकांचा’ नाश करणार आहे.—२पेत्र ३:७.
स्वतःला विचारा, ‘देवाच्या इशाऱ्याकडे लक्ष द्यायला लोकांना मदत करण्यासाठी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा मी फायदा करून घेत आहे का?’—२ती ४:२.