१५-२१ जानेवारी
ईयोब ३६-३७
गीत १४७ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. सर्वकाळच्या जीवनाचं जे अभिवचन देवाने दिलंय, त्यावर तुम्ही भरवसा का ठेवू शकता?
(१० मि.)
यहोवा स्वतः सर्वकाळासाठी अस्तित्वात आहे (ईयो ३६:२६; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.१ १२ ¶४-१३ ¶१)
सृष्टीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी यहोवाकडे बुद्धी आणि ताकद आहे (ईयो ३६:२७, २८; टेहळणी बुरूज२०.०५ २२ ¶६)
सर्वकाळाचं जीवन कसं मिळवायचं हे यहोवा आपल्याला शिकवतो (ईयो ३६:४, २२; योह १७:३)
सर्वकाळाच्या जीवनाच्या आशेवर असलेला भक्कम विश्वास आपल्याला समस्यांचा सामना करताना स्थिर उभं राहायला मदत करतो.—इब्री ६:१९; टेहळणी बुरूज२२.१० २८ ¶१६.
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
-
ईयो ३७:२०—बायबल काळात एखादी बातमी किंवा माहिती कशी कळवली जायची? (इन्साइट-१ ४९२)
-
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) ईयो ३६:१-२१ (शिकवणे अभ्यास २)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ३)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ५)
६. विश्वासाबद्दल समजावून सांगणं
(५ मि.) भाषण. सहसा विचारले जाणारे प्रश्न ५७ ¶५-१५—विषय: होलोकॉस्टच्या वेळी यहोवाच्या साक्षीदारांचाही छळ का करण्यात आला? (शिकवणे अभ्यास १८)
गीत ४९
७. वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रियेसारख्या परिस्थितींसाठी आधीच तयार राहा
(१५ मि.) चर्चा. हा भाग मंडळीतल्या वडिलांनी हाताळावा.
रक्ताबद्दल असलेल्या यहोवाच्या नियमांचं पालन करण्यासाठी त्याच्या संघटनेने आपल्याला बरीच साधनं पुरवली आहेत. (प्रेका १५:२८, २९) या साधनांचा चांगला वापर तुम्ही करत आहात का?
ड्युरेबल पावर ऑफ ॲटर्नी (डिपीए) कार्ड आणि आयडेंटीटी कार्ड (आय.सी.): या कार्डमध्ये रक्ताच्या वैद्यकीय वापराबद्दल रुग्णाची काय इच्छा आहे हे लिहिलेलं असतं. बाप्तिस्मा झालेले प्रचारक साहित्याची देखरेख करणाऱ्या बांधवाकडून स्वतःसाठी डीपीए कार्ड आणि आपल्या लहान मुलांसाठी आयडेंटीटी कार्ड घेऊ शकतात. हे दोन्ही कार्ड आपण नेहमी सोबत ठेवले पाहिजेत. तुम्ही जर हे कार्ड भरलं नसेल, तर ते भरायला किंवा आधी भरलेल्या कार्डमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर त्या करायला उशीर करू नका.
इन्फॉरमेशन फॉर एक्सपेक्टंट मदर्स (S-401; गरोदर स्त्रियांसाठी माहिती) आणि इन्फॉरमेशन फॉर रिक्वायरिंग सर्जरी ऑर किमोथेअरपी (S-407; सर्जरी किंवा किमोथेअरपीची गरज असलेल्यांसाठी माहिती): कोणत्याही वैद्यकीय उपचारासाठी आधीच तयार राहायला ही दोन्ही माहितीपत्रक तुम्हाला मदत करतील. यामध्ये रक्त घेण्याविषयीचा प्रश्नसुद्धा येतो. एखादी बहीण गरोदर असेल किंवा एखाद्या भावाची किंवा बहिणीची शस्त्रक्रिया होणार असेल किंवा ते कॅन्सरचा उपचार घेणार असतील, आणि त्यांना जर यांपैकी एखादं माहितीपत्रक हवं असेल तर ते मंडळीतल्या वडिलांकडे मागू शकतात.
हॉस्पिटल संपर्क समिती (एच.एल.सी.): रक्ताबद्दल एखादी परिस्थिती निर्माण होते तेव्हा डॉक्टरांना आणि प्रचारकांना योग्य ती माहिती पुरवण्यासाठी काही प्रशिक्षित वडील एच.एल.सी. चे सभासद म्हणून काम करतात. रक्ताचं संक्रमण टाळण्यासाठी कोणते वैद्यकीय पर्याय उपलब्ध आहेत याबद्दल ते उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत चर्चा करतात. जर गरज असेल तर रक्ताशिवाय उपचार करणारे डॉक्टर शोधण्यासाठी ते तुम्हाला मदत करू शकतात. ते आठवड्याचे सातही दिवस, २४ तास मदत देण्यासाठी तयार असतात. असं होऊ शकतं, की तुम्हाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागणार असेल किंवा तुमच्यावर शस्त्रक्रिया किंवा कॅन्सरसारख्या आजारांसाठी काही उपचार केले जाणार असतील. अशा वेळी रक्ताचा प्रश्न निर्माण होणार नाही असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी लवकरात लवकर एच.एल.सी. सोबत संपर्क करा. ही गोष्ट गरोदर असलेल्या बहिणींनासुद्धा लागू होते. याविषयी तुम्हाला काही मदत हवी असेल तर एच.एल.सी. सोबत संपर्क करण्यासाठी लागणारी माहिती तुम्ही मंडळीतल्या वडिलांना विचारू शकता.
हॉस्पिटल संपर्क समिती तुम्हाला कशी मदत करू शकते? हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेला प्रश्न विचारा:
वैद्यकीय उपचारांची किंवा शस्त्रक्रियेची गरज निर्माण होते तेव्हा एच.एल.सी. मुळे तुम्हाला कशी मदत मिळू शकते?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. ४ ¶९-१२, पान ३४ वरची चौकट