व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१९-२५ फेब्रुवारी

स्तोत्रं ८-१०

१९-२५ फेब्रुवारी

गीत २ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “हे यहोवा, मी . . . तुझी स्तुती करीन”

(१० मि.)

यहोवाने आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात चांगुलपणा दाखवला आहे (स्तो ८:३-६; टेहळणी बुरूज२१.०८ ३ ¶६)

यहोवाने ज्या अद्‌भुत गोष्टी केल्या आहेत त्यांबद्दल इतरांना सांगून आपण आनंदाने त्याची स्तुती करतो (स्तो ९:१; टेहळणी बुरूज२०.०५ २३ ¶१०)

आपण मनापासून गीत गाऊनही त्याची स्तुती करतो (स्तो ९:२; टेहळणी बुरूज२२.०४ ७ ¶१३)

स्वतःला विचारा, ‘मी आणखी कोणत्या मार्गांनी यहोवाची स्तुती करू शकतो?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ८:३—स्तोत्रकर्त्याने देवाच्या हातांचा उल्लेख केला तेव्हा त्याला काय म्हणायचं होतं? (इन्साइट-१ ८३२)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक सांगतो की तो देवाला मानत नाही. (शिष्य बनवा  धडा ५ मुद्दा ४)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. मागच्या भेटीत समोरच्या व्यक्‍तीने तो देवाला मानत नसल्याचं सांगितलं होतं. पण देवाच्या अस्तित्वाचे पुरावे तपासायला तो तयार आहे. (शिकवणे  अभ्यास ७)

६. भाषण

(५ मि.) टेहळणी बुरूज२१.०६ ६-७ ¶१५-१८—विषय: आपल्या बायबल विद्यार्थ्यांना यहोवाची स्तुती करायला मदत करा. (शिकवणे  अभ्यास १०)

ख्रिस्ती जीवन

गीत १०

७. बोलायच्या ओघात अनौपचारिक साक्षकार्य कसं करता येईल?

(१० मि.) चर्चा.

आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे यहोवाची स्तुती करायची असेल, तर दररोजची कामं करताना आपण ज्यांना भेटतो त्यांना आपण साक्ष द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. (स्तो ३५:२८) सुरुवातीला आपल्याला अनौपचारिकपणे लोकांशी बोलायला भीती वाटू शकते. पण सहजपणे संभाषणाची सुरुवात करायला आणि ते चालू ठेवायला आपण शिकतो, तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे साक्ष देता येते. तसंच त्यातून आपल्याला आनंदही मिळतो!

शांती देणारा आनंदाचा संदेशसांगायला नेहमी तयार असा​—संभाषण सुरू करण्यासाठी पुढाकार घ्या  हा व्हिडिओ दाखवा. आणि पुढे दिलेला प्रश्‍न विचारा:

अनौपचारिक साक्षकार्य आणखी प्रभावीपणे करण्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओतून काय शिकायला मिळालं?

संभाषणाची सुरुवात करण्यासाठी खाली काही गोष्टी सुचवल्या आहेत:

  •   घरातून बाहेर पडल्यानंतर इतरांसोबत बोलण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्यासाठी नेहमी तयार राहा. प्रामाणिक मनाच्या लोकांना शोधायला यहोवाकडे मदत मागा

  •   तुम्हाला भेटणाऱ्‍या लोकांशी मैत्रीपूर्वक बोला आणि त्यांच्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करा. त्यांना कशात आवड आहे हे शोधायचा प्रयत्न करा, म्हणजे बायबलमधून त्यांना काय सांगायचं हे तुम्हाला समजेल

  •   योग्य वाटत असेल तर एकमेकांना फोन नंबर द्या

  •   साक्ष देण्याआधीच जर संभाषण संपलं तर निराश होऊ नका

  •   संभाषणानंतर त्या व्यक्‍तीबद्दल विचार करा. आणि त्याला एखादं बायबलचं वचन किंवा jw.org/mr वर असलेल्या एखाद्या लेखाची लिंक पाठवून तुम्हाला त्याच्याशी चर्चा करायची इच्छा आहे, हे दाखवा

हे करून पाहा: ‘तुझा शनिवार-रविवार कसा गेला?’ असं जर तुम्हाला कोणी विचारलं, तर त्याला सभांमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा इतरांना तुम्ही बायबल कसं शिकवता ते सांगा.

८. मंडळीच्या गरजा

(५ मि.)

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ६५ आणि प्रार्थना