व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२२-२८ जानेवारी

ईयोब ३८-३९

२२-२८ जानेवारी

गीत ११ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. देवाच्या सृष्टीचं निरीक्षण करण्यासाठी तुम्ही वेळ काढता का?

(१० मि.)

सृष्टीची निर्मिती केल्यानंतर यहोवाने निर्माण केलेल्या गोष्टींचं निरीक्षण करण्यासाठी वेळ काढला (उत्प १:१०, १२; ईयो ३८:५, ६; टेहळणी बुरूज२१.०८ ९ ¶७)

यहोवाने बनवलेल्या सृष्टीचं निरीक्षण करण्यासाठी स्वर्गदूतांनी वेळ काढला (ईयो ३८:७; टेहळणी बुरूज२०.०८ १४ ¶२)

आपण सृष्टीचं निरीक्षण करण्यासाठी आणि तिच्याबद्दल आपल्या मनात कदर वाढवण्यासाठी वेळ काढतो, तेव्हा यहोवावरचा आपला भरवसा आणखी मजबूत होऊ शकतो (ईयो ३८:३२-३५; टेहळणी बुरूज२३.०३ १७ ¶८)

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • ईयो ३८:८-१०​—नियम घालून देणारा निर्माणकर्ता या नात्याने यहोवाबद्दल आपल्याला या वचनातून काय समजतं? (इन्साइट-२ २२२)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्‍तीला बोलायची इच्छा नसते, तेव्हा मैत्रीपूर्ण पद्धतीने संभाषण संपवा. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(५ मि.) घरोघरचं साक्षकार्य. आधीच्या चर्चेत, घरमालकाने तुम्हाला सांगितलं होतं की अलीकडेच त्याची जवळची व्यक्‍ती वारली आहे. (शिष्य बनवा  धडा ९ मुद्दा ३)

६. भाषण

(५ मि.) शिष्य बनवा आणखी माहिती क मुद्दा १​—विषय: आज जे काही घडतंय आणि लोक जसं वागत आहेत त्यावरून कळतं की लवकरच एक मोठा बदल होणार आहे. (शिकवणे  अभ्यास १६)

ख्रिस्ती जीवन

गीत १११

७. सृष्टीचं निरीक्षण केल्यामुळे आपल्याला जास्त महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष लावायला मदत होते

(१५ मि.) चर्चा.

सैतान आणि ईयोबच्या तीन मित्रांनी जेव्हा ईयोबवर आरोप लावले, तेव्हा त्याचं लक्ष फक्‍त स्वतःच्या समस्यांवर आणि त्याच्यावर जो अन्याय झाला होता त्यावरच होतं.

ईयोब ३७:१४ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी ईयोबला काय करावं लागलं?

आपल्यावर येणाऱ्‍या परीक्षांमुळे जेव्हा आपण भारावून जातो, तेव्हा सृष्टीचं निरीक्षण केल्यामुळे यहोवा किती महान आहे, हे लक्षात घ्यायला मदत होते. तसंच, त्याला एकनिष्ठ राहण्याचा आपला निर्धार पक्का होतो आणि आपल्या गरजा पुरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे यावरचा आपला भरवसाही वाढतो.—मत्त ६:२६.

ईयोबच्या पुस्तकातील धडे​—प्राण्यांची निर्मिती  हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

या व्हिडिओमुळे यहोवावरचा तुमचा भरवसा कसा वाढला आहे?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५६ आणि प्रार्थना