२६ फेब्रुवारी–३ मार्च
स्तोत्रं ११-१५
गीत १३९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. नवीन जगाच्या शांतिदायक परिस्थितीत तुम्ही स्वतः असल्याची कल्पना करा
(१० मि.)
सामाजिक अशांततेमुळे हिंसेला आणखी खतपाणी मिळतं (स्तो ११:२, ३; टेहळणी बुरूज०६ ६/१ ३ ¶१०)
हिंसेला यहोवा कायमचं थांबवेल असा भरवसा आपण ठेवू शकतो (स्तो ११:५; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३ १३)
यहोवाने दिलेल्या नवीन जगाच्या अभिवचनावर विचार केल्यामुळे आपल्याला धीराने वाट पाहायला मदत होते (स्तो १३:५, ६; टेहळणी बुरूज१७.०८ ६ ¶१५)
हे करून पाहा: यहेज्केल ३४:२५ वाचा आणि या वचनात लिहिलेल्या शांतिदायक परिस्थितीत तुम्ही स्वतः असल्याची कल्पना करा.—राज किताब अध्या. २२ ¶१६.
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
-
स्तो १४:१—या वचनात जे सांगितलंय त्याचा ख्रिश्चनांनासुद्धा कसा धोका असू शकतो? (टेहळणी बुरूज१३ ९/१५ १९ ¶१२)
-
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) स्तो १३:१–१४:७ (शिकवणे अभ्यास २)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(२ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्तीला स्मारकविधीला यायचं आमंत्रण द्या. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ३)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(१ मि.) घरोघरचं साक्षकार्य. समोरच्या व्यक्तीला स्मारकविधीला यायचं आमंत्रण द्या. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ४)
६. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. समोरची व्यक्ती स्मारकविधीच्या आमंत्रणाला चांगला प्रतिसाद देते. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ४)
७. शिष्य बनवण्यासाठी
(५ मि.) कायम आनंद घ्या! धडा १३ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय. खोट्या धर्माबद्दल देवाला कसं वाटतं हे समजावून सांगण्यासाठी “हेसुद्धा पाहा” भागातल्या एखाद्या लेखाचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १२)
गीत ८
८. “युद्धाच्या शस्त्रांपेक्षा बुद्धी बरी”
(१० मि.) चर्चा.
संपूर्ण जगात हिंसेचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. ही परिस्थिती बघून आणि त्याचा सामना करावा लागत असल्यामुळे आपल्याला जो त्रास होतो, तो यहोवाला माहीत आहे. आपल्याला संरक्षणाची गरज आहे, हेसुद्धा त्याला माहीत आहे. यहोवा आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी सुरक्षित ठेवतो. त्यांपैकी एक मार्ग म्हणजे, त्याचं वचन बायबल.—स्तो १२:५-७.
बायबलमध्ये असणारी बुद्धी ‘युद्धाच्या शस्त्रांपेक्षा बरी’ आहे. (उप ९:१८) खाली दिलेली बायबल तत्त्वं हिंसेपासून आपलं संरक्षण कसं करतात याचा विचार करा.
-
उप ४:९, १०—सुरक्षित नसलेल्या ठिकाणांमध्ये आणि परिस्थितींमध्ये एकटं राहण्याचं टाळा
-
नीत २२:३—सार्वजनिक ठिकाणी असताना आपल्या आजूबाजूला काय चाललंय याकडे लक्ष ठेवा
-
नीत २६:१७—ज्या गोष्टींशी तुमचा संबंध नाही त्यात विनाकारण पडू नका
-
नीत १७:१४—परिस्थिती बिघडणार आहे असं लक्षात येताच तिथून ताबडतोब निघून जा. तसंच, जेव्हा दंगलीसाठी लोक गोळा होतात तेव्हा त्या ठिकाणी राहू नका
-
लूक १२:१५—आपल्या मालकीच्या गोष्टींसाठी आपला जीव धोक्यात घालायचं टाळा
विश्वासू लोकांसारखं असा, अविश्वासू लोकांसारखं नाही—हनोखसारखं, लामेखसारखं नाही हा व्हिडिओ दाखवा. आणि पुढे दिलेला प्रश्न विचारा:
हिंसेचा सामना करत असताना योग्य ते करायला आणि योग्य निर्णय घ्यायला व्हिडिओमधल्या भावाला हनोखच्या उदाहरणातून कशी मदत मिळाली?—इब्री ११:५
काही परिस्थितींमध्ये एखाद्या भावाला किंवा बहिणीला असं वाटू शकतं, की स्वतःचं आणि आपल्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी आपण काही पावलं उचललीच पाहिजेत. असं असलं तरी, आपल्या हातून कोणाचाही जीव जाणार नाही आणि आपल्यावर रक्तदोष येणार नाही याची ते नेहमी खबरदारी घेतील.—स्तो. ५१:१४; जुलै २०१७ च्या टेहळणी बुरूज अंकातला “वाचकांचे प्रश्न” हा लेख पाहा.
९. मार्च २ पासून स्मारकविधीच्या मोहिमेची सुरुवात
(५ मि.) वडिलांद्वारे भाषण. मोहिमेसाठी, खास भाषणासाठी आणि स्मारकविधीसाठी मंडळीने काय योजना केल्या आहेत ते सांगा. मार्च आणि एप्रिल महिन्यात प्रचारक १५ तासांची सहायक पायनियर सेवा करू शकतात याची सर्वांना आठवण करून द्या.
१०. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. ६ ¶९-१७