२९ जानेवारी-४ फेब्रुवारी
ईयोब ४०-४२
गीत १२९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. ईयोबच्या अनुभवातून शिकण्यासारखे धडे
(१० मि.)
यहोवाच्या आणि आपल्या दृष्टिकोनात खूप फरक आहे (ईयो ४२:१-३; टेहळणी बुरूज१० १०/१५ ३-४ ¶४-६)
यहोवा आणि त्याच्या संघटनेकडून मिळणारा सल्ला स्वीकारायला उशीर करू नका (ईयो ४२:५, ६; टेहळणी बुरूज१७.०६ २५ ¶१२)
परीक्षेतून जात असतानाही एकनिष्ठ राहणाऱ्यांना यहोवा आशीर्वाद देतो (ईयो ४२:१०-१२; याक ५:११; टेहळणी बुरूज२२.०६ २५ ¶१७-१८)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
-
ईयो ४२:७—ईयोबचे तीन मित्र खरंतर कोणाविरुद्ध बोलत होते आणि ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आपली जेव्हा टीका केली जाते तेव्हा तिचा सामना करायला आपल्याला कशी मदत होईल? (इन्साइट-२ ८०८)
-
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) ईयो ४२:१-१७ (शिकवणे अभ्यास ११)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक ख्रिस्ती नाही. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ३)
५. शिष्य बनवण्यासाठी
६. भाषण
(४ मि.) शिष्य बनवा आणखी माहिती क मुद्दा २—विषय: पृथ्वीचा कधीच नाश होणार नाही. (शिकवणे अभ्यास १३)
गीत १०८
७. इतरांना यहोवाच्या प्रेमाची जाणीव करून द्या
(१५ मि.) चर्चा.
देव प्रेम आहे. (१यो ४:८, १६) आणि अशा देवाची उपासना करणं हा आपल्यासाठी मोठा बहुमान आहे. त्याच्या प्रेमामुळेच आपण त्याच्याकडे आकर्षित होतो आणि त्याच्याशी मैत्री करायला प्रवृत्त होतो. आणि त्याचे सेवक असल्यामुळे आपण सर्व जण त्याचं हे प्रेम अनुभवतो.
आपण आपल्या घरच्यांशी, मंडळीतल्या भाऊबहिणींशी आणि इतरांशी प्रेमाने वागतो, तेव्हा आपण यहोवाचं अनुकरण करत असतो. (ईयो ६:१४; १यो ४:११) आपण इतरांशी प्रेमाने वागतो, तेव्हा त्यांना यहोवाची ओळख करून घ्यायला आणि त्याच्या जवळ जायला मदत करत असतो. पण जर आपण त्यांच्याशी प्रेमाने वागलो नाही, तर त्यांना कदाचित यहोवाच्या प्रेमाची जाणीव होणार नाही.
यहोवाच्या कुटुंबात आम्ही ख्रिस्ती प्रेम अनुभवलं हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
इतरांवर प्रेम करणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला लैलै आणि मिमिच्या उदाहरणातून कसं शिकायला मिळतं?
आपल्या भाऊबहिणींना यहोवाच्या प्रेमाची जाणीव व्हावी म्हणून आपण कायकाय करू शकतो?
-
आपले भाऊबहीण यहोवाची मेंढरं आहेत आणि ते त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहेत असा दृष्टिकोन ठेवा.—स्तो १००:३
-
त्यांना नेहमी प्रोत्साहन मिळेल असं बोला.—इफि ४:२९
-
त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा.—मत्त ७:११, १२
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. ५ ¶१-८, पान ३९ वरची चौकट