व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

८-१४ जानेवारी

ईयोब ३४-३५

८-१४ जानेवारी

गीत ३० आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. अन्याय होत आहे असं वाटतं तेव्हा . . .

(१० मि.)

यहोवा कधीच अन्यायीपणे वागत नाही हे लक्षात ठेवा (ईयो ३४:१०; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१९.१ ८ ¶२)

दुष्ट लोकांना शिक्षा होत नाही असं वाटू शकतं, पण त्यांचा दुष्टपणा यहोवापासून लपत नाही (ईयो ३४:२१-२६; टेहळणी बुरूज१७.०४ १० ¶५)

अन्यायाला बळी पडलेल्यांना मदत करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे, त्यांना यहोवाबद्दल शिकवणं (ईयो ३५:९, १०; मत्त २८:१९, २०; टेहळणी बुरूज२१.०५ ७ ¶१९-२०)

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • ईयो ३५:७—“तुझ्याकडून [देवाला] काय फायदा होईल?” असं अलीहूने ईयोबला विचारलं, तेव्हा त्याला काय म्हणायचं होतं? (टेहळणी बुरूज१७.०४ २९ ¶३)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यासासाठी विचारा. (शिष्य बनवा  धडा १० मुद्दा ३)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. लहान मुलं असलेल्या एखाद्या व्यक्‍तीला jw.org वर पालकांसाठी उपयोगी असलेली माहिती कशी शोधायची ते दाखवा. (शिष्य बनवा  धडा १ मुद्दा ४)

६. शिष्य बनवण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

गीत ५८

७. अनौपचारिकपणे “वचनाची घोषणा” करायला तुम्ही तयार आहात का?

(१५ मि.) चर्चा.

पौलने तीमथ्यला असं म्हटलं: “वचनाची घोषणा कर; काळाची गरज” ओळख. (२ती ४:२) या वचनात, “काळाजी गरज ओळखून” असं जे म्हटलंय त्यासाठी असणारा मूळ ग्रीक शब्द काही वेळा, एखाद्या सैनिकाला किंवा पहारा देणाऱ्‍या पहारेकऱ्‍याला उद्देशून वापरला जायचा. हा पहारेकरी नेहमी  तयार आणि सतर्क असायचा. आपणसुद्धा लोकांसोबत बोलत असताना नेहमी  साक्ष देण्याची संधी शोधत असतो हे या शब्दांवरून दिसून येतं.

यहोवाबद्दल आपल्या मनात जे प्रेम आहे आणि तो आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल आपल्या मनात जी कदर आहे, त्यांमुळे आपल्याला त्याच्या सुंदर गुणांबद्दल इतरांना सांगायची प्रेरणा मिळते.

स्तोत्र ७१:८ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

तुम्हाला यहोवाबद्दल कोणत्या चांगल्या गोष्टी इतरांना सांगायला आवडतात?

लोकांवर प्रेम असल्यामुळे आपण त्यांना अनौपचारिक पद्धतीनेसुद्धा साक्ष देतो.

शेकडो लोकांना बायबलचं सत्य कसं कळलं?  हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   अनौपचारिक साक्षकार्यामुळे शेकडो लोकांना बायबलचं सत्य कसं कळलं?

  •   व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, चर्चला जाणाऱ्‍या लोकांना सत्य शिकल्यामुळे कसा फायदा झाला?

  •   लोकांवर प्रेम असल्यामुळे आपण त्यांना अनौपचारिकपणे साक्ष द्यायला कसं प्रवृत्त होतो?

  •   अनौपचारिक साक्षकार्य हा लोकांना यहोवाची ओळख करून द्यायचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे असं का म्हणता येईल?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १३५ आणि प्रार्थना