व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१०-१६ फेब्रुवारी

स्तोत्रं १४७-१५०

१०-१६ फेब्रुवारी

गीत १२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. याहची स्तुती करण्यासाठी आपल्याकडे बरीच कारणं आहेत

(१० मि.)

त्याला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे (स्तो १४७:३, ४; टेहळणी बुरूज१७.०७ १८ ¶५-६)

त्याला आपल्या मर्यादा माहीत आहेत आणि आपल्याला मदत करण्यासाठी तो त्याच्या ताकदीचा वापर करतो (स्तो १४७:५; टेहळणी बुरूज१७.०७ १८ ¶७)

तो आपल्याला त्याच्या संघटनेचा भाग व्हायचा बहुमान देतो (स्तो १४७:१९, २०; टेहळणी बुरूज१७.०७ २१ ¶१८)


स्वतःला विचारा, ‘यहोवाची स्तुती करण्यासाठी मला आणखी कोणत्या गोष्टींमुळे प्रेरणा मिळते?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १४८:१, १०—यहोवाने निर्माण केलेल्या काही पक्ष्यांच्या बाबतीत तुम्हाला कोणती गोष्ट विशेष वाटते? (यहोवा के करीब अध्या. ५ ¶१६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक तुम्हाला सांगतो की त्याला एक गंभीर आजार आहे. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ५)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. अलीकडच्या सभेमध्ये तुम्हाला जे शिकायला मिळालं, त्यातली एखादी गोष्ट समोरच्या व्यक्‍तीला सांगण्याची संधी शोधा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ३)

६. भाषण

(५ मि.) टेहळणी बुरूज१९.०३ १० ¶७-११—विषय: येशूचं ऐका—आनंदाचा संदेश सांगा. चित्र पाहा. (शिकवणे अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

गीत १५९

७. वार्षिक सेवा अहवाल

(१५ मि.) चर्चा.

शाखा कार्यालयाकडून आलेल्या वार्षिक सेवा अहवालाची घोषणा वाचल्यानंतर, ‘जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२४ सालचा सेवा वर्ष अहवाल’ यातल्या काही ठळक गोष्टी प्रचारकांना विचारा. मागच्या सेवा वर्षादरम्यान प्रचारात चांगले अनुभव आलेल्या काही भाऊबहिणींची मुलाखत घ्या. या प्रचारकांना आधीच निवडलं जावं.

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ३७ आणि प्रार्थना