व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२०-२६ जानेवारी

स्तोत्रं १३८-१३९

२०-२६ जानेवारी

गीत ९३ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. भीतीमुळे स्वतःला रोखू नका

(१० मि.)

आपल्याला मनापासून यहोवाची स्तुती करायची आहे (स्तो १३८:१)

सभांमध्ये उत्तरं द्यायला भीती वाटते, तेव्हा यहोवाकडे मदत मागा (स्तो १३८:३)

अशी भीती वाटणं चांगली गोष्ट असू शकते (स्तो १३८:६; टेहळणी बुरूज१९.०१ १० ¶१०)

टीप: छोटीछोटी उत्तरं दिल्यामुळे आपली भीती कमी होऊ शकते.—टेहळणी बुरूज२३.०४ २१ ¶७.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १३९:२१, २२—ख्रिश्‍चनांनी सगळ्यांनाच माफ केलं पाहिजे का? (इन्साइट-१ ८६२ ¶४)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ३)

५. शिष्य बनवण्यासाठी

(४ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. बायबल अभ्यासाविषयी विचारा आणि तो कसा केला जातो ते दाखवा. (शिष्य बनवा धडा १० मुद्दा ३)

६. भाषण

(५ मि.) सावध राहा!९९ १२/०८ पानं १२-१४—विषय: मला माझ्या लाजाळू स्वभावावर कशी मात करता येईल? (शिकवणे अभ्यास १६)

ख्रिस्ती जीवन

गीत ५९

७. लाजाळू स्वभाव असूनसुद्धा तुम्ही प्रचारातून आनंद मिळवू शकता

(१५ मि.) चर्चा.

तुम्ही लाजाळू स्वभावाचे आहात का? चारचौघांत असताना लोकांचं आपल्याकडे लक्ष जाऊ नये असं तुम्हाला वाटतं का? दुसऱ्‍यांशी बोलायच्या विचारानेच तुमच्या पोटात गोळा येतो का? कधीकधी लाजाळू स्वभावामुळे आपल्याला आवडत असलेल्या गोष्टीसुद्धा आपण करत नाही. असं असलं तरी अनेक जणांनी आपल्या लाजाळू स्वभावावर मात केली आहे. इतकंच नाही, तर ते लोकांना बायबलमधला संदेश सांगून प्रचाराच्या कामाचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो?

लाजाळू असूनही यहोवासाठी सर्वकाही केलं हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   सिस्टर ली हिच्या आजीने तिला सांगितलं, “यहोवाच्या सेवेसाठी सर्वकाही कर.” हा सल्ला लागू केल्यामुळे तिला कसा फायदा झाला?

मोशे, यिर्मया आणि तीमथ्य यांचा स्वभावही कदाचित लाजाळू असावा, असं आपल्याला बायबलमधून दिसून येतं. (निर्ग ३:११; ४:१०; यिर्म १:६-८; १ती ४:१२) तरी, यहोवा त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांना त्याच्या सेवेत मोठमोठ्या गोष्टी करता आल्या. (निर्ग ४:१२; यिर्म २०:११; २ती १:६-८)

यशया ४३:१, २ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   यहोवा त्याच्या सेवकांना कोणतं वचन देतो?

लाजाळू स्वभावाच्या भाऊबहिणींना प्रचारातून आनंद मिळावा म्हणून यहोवा आज त्यांना कशी मदत करतो?

बाप्तिस्मा घेतल्यामुळे आनंद आणखी कसा वाढतो? —निवडक भाग हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   प्रचार करताना सिस्टर जॅक्सनने यहोवाची ताकद आणि त्याची साथ कशी अनुभवली?

  •   लाजाळू स्वभावाच्या व्यक्‍तीला प्रचारकार्यामुळे कशी मदत होऊ शकते?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १५१ आणि प्रार्थना