२४ फेब्रुवारी-२ मार्च
नीतिवचनं २
गीत ३५ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. आपल्याला वैयक्तिक अभ्यासाची उत्सुकता का असली पाहिजे?
(१० मि.)
सत्याबद्दल आदर दाखवण्यासाठी (नीत २:३, ४; टेहळणी बुरूज२२.०८ १९ ¶१६)
चांगले निर्णय घेण्यासाठी (नीत २:५-७; टेहळणी बुरूज२२.१० १९ ¶३-४)
विश्वास मजबूत करण्यासाठी (नीत २:११, १२; टेहळणी बुरूज१६.०९ २३ ¶२-३)
स्वतःला विचारा, ‘मी स्वतःला नियमितपणे वैयक्तिक अभ्यास करण्याची सवय कशी लावू शकतो?’
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
-
नीत २:४-६—वैयक्तिक अभ्यासाची कोणती पद्धत तुम्हाला प्रभावी वाटते? (टेहळणी बुरूज२२.०८ १९ ¶१६)
-
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत २:१-२२ (शिकवणे अभ्यास १२)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. विवाहित जोडप्यासाठी उपयोगी माहिती jw.org वर कशी शोधायची हे घरमालकाला दाखवा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ३)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. मागच्या भेटीत समोरच्या व्यक्तीने ज्या विषयात आवड दाखवली होती, त्याबद्दलचं एक मासिक तिला द्या. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)
६. भाषण
(५ मि.) शिष्य बनवा आणखी माहिती क मुद्दा ८—विषय: पती-पत्नीने एकमेकांना विश्वासू राहिलं पाहिजे. (शिकवणे अभ्यास १३)
गीत ९६
७. तुम्हाला गुप्त खजिना शोधायला आवडेल का?
(१५ मि.) चर्चा.
मुलांनो, तुम्हाला गुप्त खजिना शोधायला आवडेल का? असं असेल, तर बायबल तुम्हाला एक खूप मौल्यवान खजिना शोधायचं आमंत्रण देतं. तो खजिना म्हणजे देवाचं ज्ञान! (नीत २:४, ५) मग तुम्ही हा खजिना कसा शोधू शकता? त्यासाठी तुम्हाला नियमितपणे बायबल वाचावं लागेल आणि त्यात दिलेल्या घटनांचा खोलवर अभ्यास करावा लागेल. असं केल्यामुळे तुम्हाला खूप मज्जा येईल आणि बरंच शिकायलाही मिळेल.
-
बायबल वाचत असताना तुम्ही स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकता? (टेहळणी बुरूज२४.०२ ३२ ¶२-३)
-
या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही कोणत्या साधनांचा वापर करू शकता?
चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या, या व्हिडिओ मालिकेमुळे तुम्हाला बायबलमधून वाचलेल्या गोष्टींवर मनन कसं करायचं, हे समजायला मदत होईल.
चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या—हाबेल हा व्हिडिओ दाखवा.
उत्पत्ती ४:२-४ आणि इब्री लोकांना ११:४ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
-
हाबेलने कसं दाखवून दिलं की तो यहोवाचा मित्र होता?
-
हाबेलने यहोवावरचा विश्वास कसा मजबूत केला?
-
तुम्ही तुमचा विश्वास कसा मजबूत करू शकता?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. २३ ¶१-८ आणि भाग ८