व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२७ जानेवारी–२ फेब्रुवारी

स्तोत्रं १४०-१४३

२७ जानेवारी–२ फेब्रुवारी

गीत ४४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. प्रार्थनेप्रमाणे कामही करा

(१० मि.)

सल्ला स्वीकारायला तयार राहा (स्तो १४१:५; टेहळणी बुरूज२२.०२ १२ ¶१३-१४)

यहोवाने आपल्याला आणि प्राचीन काळातल्या त्याच्या लोकांना कशी मदत केली यावर विचार करा (स्तो १४३:५; टेहळणी बुरूज१० ३/१५ ३२ ¶४)

परिस्थितीकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न करा (स्तो १४३:१०; टेहळणी बुरूज१५ ३/१५ ३२ ¶२)

स्तोत्रं १४०-१४३ यांत दावीदने केलेल्या मदतीच्या याचनांबद्दल वाचायला मिळतं. पण त्यासोबतच, त्याने प्रार्थनेप्रमाणे केलेल्या कामांबद्दलही आपल्याला यांत वाचायला मिळतं.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १४१:१, २—प्रार्थना आपल्याला मिळालेला एक बहुमान आहे हे दावीदने कसं दाखवून दिलं? (टेहळणी बुरूज२२.०७ २० ¶२)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. एखाद्याला व्यावहारिक मार्गाने मदत केल्यावर त्याच्याशी बायबलच्या विषयावर बोला. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. समोरची व्यक्‍ती सांगते की तिच्याकडे जास्त वेळ नाही. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ३)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) प्रात्यक्षिक. सहसा विचारले जाणारे प्रश्‍न २१—विषय: यहोवाचे साक्षीदार रक्‍तसंक्रमण का स्वीकारत नाहीत? (शिकवणे अभ्यास ७)

ख्रिस्ती जीवन

गीत १४१

७. वैद्यकीय उपचार किंवा सर्जरीसाठी योग्य निर्णय घेता यावा म्हणून आधीच तयारी करा

(१५ मि.) चर्चा.

यहोवा वचन देतो, की “संकटाच्या वेळी साहाय्य करण्यासाठी तो नेहमी तयार असतो.” (स्तो ४६:१) वैद्यकीय उपचार घेण्यासारखी किंवा सर्जरी करण्यासारखी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आपला तणाव वाढू शकतो. पण, अशा परिस्थितींसाठी आपल्याला तयार राहता यावं म्हणून यहोवाने हवी असलेली मदत पुरवली आहे. उदाहरणार्थ, त्याच्या संघटनेने आपल्याला ड्युरेबल पावर ऑफ ॲटर्नी (डिपीए) कार्ड, आयडेंटीटी कार्ड a आणि इतर वैद्यकीय माहिती b पुरवली आहे. त्यासोबतच हॉस्पिटल संपर्क समितीचीसुद्धा (एच.एल.सी.) आपल्याला मदत होते. यांमुळे आपल्याला रक्‍ताबद्दल असलेला देवाचा नियम पाळायला मदत होते.—प्रेका १५:२८, २९.

तुम्ही वैद्यकीय परिस्थितींना तोंड द्यायला तयार आहात का? हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   डिपीए कार्ड भरल्यामुळे काहींना कसा फायदा झाला आहे?

  •   इन्फॉरमेशन फॉर एक्सपेक्टंट मदर्स (S-401; गरोदर स्त्रियांसाठी माहिती) या फॉर्ममधल्या माहितीमुळे काहींना कशी मदत झाली?

  •   तुम्हाला कदाचित हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार असेल, सर्जरी करावी लागणार असेल किंवा कॅन्सरसारख्या आजारांवर थेरपी घ्यावी लागणार असेल. अशा वेळी तुम्हाला वाटेल, की रक्‍तसंक्रमणाबद्दल कोणताही प्रश्‍न निर्माण होणार नाही. पण तरीही, लवकरात लवकर एच.एल.सी. च्या भावांना संपर्क करणं का चांगलं राहील?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १०३ आणि प्रार्थना

a बाप्तिस्मा झालेले प्रचारक साहित्याची देखरेख करणाऱ्‍या भावाकडून स्वतःसाठी डिपीए कार्ड आणि आपल्या लहान मुलांसाठी आयडेंटीटी कार्ड घेऊ शकतात.

b गरजेच्या वेळी पुढे दिलेली माहिती तुम्ही वडिलांकडून मागू शकता: S-401 (गरोदर स्त्रियांसाठी माहिती), S-407 (सर्जरी किंवा किमोथेरपीची गरज असलेल्यांसाठी माहिती) आणि S-55 (ज्या मुलांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे त्यांच्या आईवडिलांसाठी माहिती).