व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

३-९ फेब्रुवारी

स्तोत्रं १४४-१४६

३-९ फेब्रुवारी

गीत १४५ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “यहोवा ज्यांचा देव आहे, ते लोक सुखी आहेत!”

(१० मि.)

यहोवावर विसंबून राहणाऱ्‍यांना तो आशीर्वाद देतो (स्तो १४४:११-१५; टेहळणी बुरूज१८.०४ ३२ ¶२-३)

आपण आपल्या आशेमुळे आनंदी राहतो (स्तो १४६:५; टेहळणी बुरूज२२.१० २८ ¶१६-१७)

ज्यांचा देव यहोवा आहे ते नेहमी आनंदी राहतील (स्तो १४६:१०; टेहळणी बुरूज१८.०१ २६ ¶१९-२०)

यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केल्यामुळे समस्या असतानाही आपण आनंदी राहू शकतो

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. समोरची व्यक्‍ती सांगते की ती विद्यापीठात शिकत आहे. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. शिकवण्याच्या साधनांमधल्या एखाद्या व्हिडिओबद्दल सांगा आणि त्यावर चर्चा करा. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ४)

६. भाषण

(४ मि.) शिष्य बनवा आणखी माहिती क मुद्दा ७—विषय: पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर केला पाहिजे.​ (शिकवणे अभ्यास १)

ख्रिस्ती जीवन

गीत ५९

७. तुम्ही आनंदी असावं असं यहोवाला वाटतं

(१० मि.) चर्चा.

यहोवा आनंदी देव आहे. (१ती १:११) त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि त्याची इच्छा आहे की आपण आनंदी असावं. म्हणूनच त्याने आपल्याला बऱ्‍याच चांगल्या भेटी दिल्या आहेत. (उप ३:१२, १३) यांपैकी दोन भेटींचा विचार करा: चविष्ट अन्‍न आणि ऐकण्याची क्षमता.

सृष्टीतून दिसून येतं की आपण आनंदी राहावं असं यहोवाला वाटतं-चविष्ट अन्‍न आणि ऐकण्याची क्षमता हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   चविष्ट अन्‍न आणि ऐकण्याची क्षमता या भेटींवरून आपण आनंदी राहावं असं यहोवाला वाटतं, या गोष्टीची खातरी तुम्हाला कशी पटते?

स्तोत्र ३२:८ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   आपण आनंदी राहावं असं यहोवाला वाटतं हे आपल्याला समजलंय. मग यामुळे, बायबल आणि त्याच्या संघटनेकडून तो जे मार्गदर्शन देतो ते पाळायला तुम्हाला कशी मदत होते?

८. मंडळीच्या गरजा

(५ मि.)

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ८५ आणि प्रार्थना