व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

६-१२ जानेवारी

स्तोत्रं १२७-१३४

६-१२ जानेवारी

गीत १३४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. आईवडिलांनो—आपल्या अनमोल वारशाची काळजी घेत राहा

(१० मि.)

कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी यहोवा आईवडिलांना मदत करेल असा भरवसा ते ठेवू शकतात (स्तो १२७:१, २)

मुलं यहोवाकडून मिळालेला अनमोल वारसा आहेत (स्तो १२७:३; टेहळणी बुरूज२१.०८ ५ ¶९)

प्रत्येक मुलाची गरज ओळखून त्याला त्याप्रमाणे प्रशिक्षण द्या (स्तो १२७:४; टेहळणी बुरूज१९.१२ २७ ¶२०)

आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी आईवडील जेव्हा यहोवावर भरवसा ठेवतात आणि मनापासून प्रयत्न करतात तेव्हा ते यहोवाला आवडतं

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ३)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरची व्यक्‍ती बायबलच्या विरोधात असलेल्या शिकवणीबद्दल बोलते. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ४)

६. शिष्य बनवण्यासाठी

(५ मि.) कायम आनंद घ्या! धडा १६ मुद्दे ४-५. पुढच्या आठवड्यात तुम्ही अभ्यास घ्यायला प्रत्यक्ष नसल्यामुळे, तुम्ही बायबल अभ्यासाची काय व्यवस्था केली आहे हे विद्यार्थ्याला सांगा. (शिष्य बनवा धडा १० मुद्दा ४)

ख्रिस्ती जीवन

गीत १३

७. आईवडिलांनो—तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही हे जबरदस्त साधन वापरत आहात का?

(१५ मि.) चर्चा.

आईवडिलांना आपल्या मुलांना शिकवता यावं म्हणून यहोवाच्या संघटनेने बरीच प्रकाशनं काढली आहेत. असं असलं तरी, मुलांना शिकवण्यासाठी आईवडिलांकडे असलेलं जबरदस्त साधन म्हणजे त्यांचं स्वतःचं उदाहरण.—अनु ६:५-९.

आपल्या शिष्यांना शिकवण्यासाठी येशूनेही हेच साधन वापरलं.

योहान १३:१३-१५ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   स्वतःच्या उदाहरणातून शिकवण्याची येशूची पद्धत प्रभावी होती असं तुम्हाला का वाटतं?

तुम्ही मुलांना जे शिकवता तेच तुम्ही स्वतः करता, तेव्हा त्याचा मुलांवर चांगला प्रभाव पडतो. तुमच्या चांगल्या उदाहरणामुळे तुम्ही शिकवलेल्या गोष्टी मुलं ऐकतील आणि त्याप्रमाणे वागतील.

आम्ही मुलांसमोर स्वत:चं चांगलं उदाहरण ठेवलं हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   ब्रदर आणि सिस्टर गार्सिया यांनी आपल्या मुलींना कोणते महत्त्वाचे धडे शिकवले?

  •   आपल्या मुलांसमोर एक चांगलं उदाहरण मांडत राहण्यासाठी या व्हिडिओमुळे तुम्हाला कशी मदत झाली आहे?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ७३ आणि प्रार्थना