नमुना सादरीकरणं
मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35 पत्रिका)
प्रश्न: कधीकधी एखाद्या अपघातामुळं किंवा काही कारणांमुळं आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो. तुम्हाला वाटतं का, की आपण त्यांना पुन्हा भेटू शकतो?
वचन: प्रेकृ २४:१५
सादरता: देव लवकरच मृत लोकांना पुन्हा जिवंत करणार आहे यावर आपण विश्वास का ठेवू शकतो, याची तीन कारणं या पत्रिकेत दिली आहेत.
मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35 पत्रिका) शेवटचं पान
प्रश्न: तुम्हाला माहीत आहे का, की कासव जवळजवळ १५० वर्ष जगतो, काही विशिष्ट प्रकारची झाडं हजारो वर्षांपर्यंत जिवंत राहतात; पण मानव मात्र ७० ते ८० वर्षच जगतात. मानवांचं आयुष्य इतकं कमी का?
वचन: उत्प ३:१७-१९
सादरता: देवाकडून आनंदाची बातमी! या माहितीपत्रकातील पाठ ६ मध्ये आपल्याला या प्रश्नाचं शास्त्रावर आधारित उत्तर मिळतं.
देवाकडून आनंदाची बातमी!
सादरता: आपल्या मनात अनेक प्रश्न येतात ज्यांची उत्तरं आपल्याला हवी असतात. या माहितीपत्रकात त्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत.
प्रश्न: या माहितीपत्रकाचा अभ्यास करणं खूप सोपं आहे. त्यातील धड्यांची रचना किती सोपी आहे ते मी तुम्हाला दाखवतो. [धडा २ प्रश्न १ वर चर्चा करा.]
वचन: प्रक ४:११
स्वतःचं सादरीकरण तयार करा
वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.