व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | एज्रा ६-१०

कुरकुर न करता आनंदानं सेवा करणाऱ्यांवर यहोवा संतुष्ट असतो

कुरकुर न करता आनंदानं सेवा करणाऱ्यांवर यहोवा संतुष्ट असतो

एज्रा जेरूसलेमला परतण्याची तयारी करतो

७:६, २२; ८:२६, २७

  • एज्राला अर्तहशश्त राजाकडून जेरूसलेमला परत येऊन यहोवाची शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळते

  • एज्रानं राजाकडं यहोवाच्या मंदिरासाठी जे काही मागितलं होतं, म्हणजे सोनं, चांदी, गहू, द्राक्षारस, तेल आणि मीठ, ते सर्व राजानं त्याला दिलं. आजच्या दिवसांत या सर्वांची किंमत, ६०० कोटी रुपयांपेक्षा (₹ ६,००,००,००,०००) अधिक होती

• जेरूसलेमचा परतीचा प्रवास खडतर असणार होता

यहोवा त्याच्या सेवकांचं संरक्षण करेल, असा एज्राला भरवसा होता

  • ७:१३; ८:२१-२३

  • बॅबिलोनहून जेरूसलेमचा पल्ला जवळजवळ १,६०० किलोमीटरचा असावा; शिवाय त्यांना अनेक धोकादायक क्षेत्रांतून प्रवास करावा लागणार होता

  • या प्रवासाला त्यांना सुमारे ४ महिने लागले

  • परत आलेल्या सर्वांना भक्कम विश्वास, खऱ्या उपासनेबद्दल आवेश आणि धैर्य असणं गरजेचं होतं

एज्रानं निघताना सोबत . . .

७५० किक्कार वजनाचं सोनं व चांदी घेतली किंवा पूर्ण वाढ झालेल्या ३ नर आफ्रिकन हत्तींच्या वजनाइतकं सोनं व चांदी घेतली!

परत आलेल्यांना तोंड द्याव्या लागलेल्या समस्या . . .

लुटारू, वाळवंट, जंगली जनावर