ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—पुनर्भेटीसाठी पाया घाला
हे का महत्त्वाचं:
पेरणी केल्यावर जसं एक शेतकरी शेताला पाणी घालतो तसंच आपण पेरलेल्या सत्याच्या बियांना पाणी घातलं पाहिजे. (१करिंथ ३:६) एक व्यक्ती राज्याच्या सुवार्तेत आवड दाखवते तेव्हा निघण्याआधी आपण तिला एखादा प्रश्न विचारू शकतो; आणि ‘याची चर्चा आपण पुढच्या वेळेस करू’ असं सांगू शकतो. याचा असा फायदा होईल, की त्या व्यक्तीला उत्सुकता लागून राहील आणि तुम्हालाही पुनर्भेटीची तयारी करण्यास सोपं जाईल. तुम्ही तिला पुन्हा भेटाल तेव्हा मागच्या वेळेस तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आला आहात असं सांगून सुरुवात करू शकता.
हे कसं करावं:
-
घरोघरच्या साक्षकार्याची सादरता तयार करत असतानाच पुढच्या भेटीत चर्चा करता येईल अशा एका प्रश्नाचा विचार करा. या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्ही पहिल्या भेटीतच देत असलेल्या साहित्यामध्ये असू शकतं; किंवा ज्यातून आपण बायबल अभ्यास करतो अशा एखाद्या प्रकाशनात असू शकतं जे तुम्ही पुढच्या भेटीत देऊ शकता.
-
एखाद्या व्यक्तीनं राज्याच्या सुवार्तेत आवड दाखवली तर चर्चेच्या शेवटी तिला असं सांगा, की ‘तुमच्याशी परत चर्चा करायला मला आवडेल’ आणि मग तुम्ही तयार केलेला प्रश्न विचारा. तिचं नाव, पत्ता, फोन नंबर लिहून घ्या.
-
तुम्ही तिला पुढच्या भेटीची वेळ दिली असेल तर त्याच वेळी तिला नक्की भेटा.—मत्त ५:३७.