४-१० जानेवारी
२ इतिहास २९-३२
गीत ३७ व प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“खऱ्या उपासनेत कष्ट घ्यावे लागतात”: (१० मि.)
२इति २९:१०-१७—हिज्किया पूर्ण निश्चयानं खऱ्या उपासनेची पुनःस्थापना करतो
२इति ३०:५, ६, १०-१२—हिज्किया सर्व प्रामाणिक मनाच्या लोकांना उपासनेसाठी एकत्र येण्याचं आमंत्रण देतो
२इति ३२:२५, २६—हिज्किया त्याची घमेंड सोडून नम्र बनतो (टेहळणी बुरूज०५ ११/१ पृ. १६, परि. २०)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
२इति २९:११—हिज्कियानं सर्वात आधी कोणत्या गोष्टीकडं लक्ष दिलं आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो? (टेहळणी बुरूज१३ ११/१५ पृ. १७, परि. ६-७)
२इति ३२:७, ८—भविष्यात येणाऱ्या संकटांची तयारी करताना आपण कोणती सर्वात महत्त्वाची गोष्ट करू शकतो? (टेहळणी बुरूज१३ ११/१५ पृ. २०, परि. १७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: २इति ३१:१-१० (४ मि. किंवा कमी)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. T-35 पत्रिकेचा वापर करून पहिल्या सादरीकरणाचं प्रात्यक्षिक दाखवा आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. प्रचारकानं पुनर्भेटीची योजना कशी केली त्यावर जोर द्या. त्यानंतर, T-35 पत्रिकेच्या दुसऱ्या सादरीकरणाचं प्रात्यक्षिक दाखवून वरीलप्रमाणे चर्चा करा. आणि शेवटी आनंदाची बातमी माहितीपत्रकाच्या नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवून मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. “आनंदाची बातमी माहितीपत्रकातून बायबल अभ्यास कसा सुरू करायचा” असं शीर्षक असलेला लेख दाखवा आणि त्यावर थोडक्यात चर्चा करा. प्रचारकांना स्वतःचं सादरीकरण तयार करण्याचं उत्तेजन द्या.
ख्रिस्ती जीवन
“उपासना स्थळांचं बांधकाम व देखभाल करण्याचा सुहक्क”: (१५ मि.) चर्चा. राज्य सभागृहाच्या बांधकाम प्रकल्पात कुणी भाग घेतला असेल तर त्यांना विचारा, की या कामात भाग घेतल्यामुळं त्यांना कोणता आनंद मिळाला. स्थानिक राज्य सभागृहाच्या स्वच्छतेचं व देखभालीचं काम पाहणाऱ्या बांधवाची थोडक्यात मुलाखत घ्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा ९३ (३० मि.)
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ५५ आणि प्रार्थना