सेवाकार्यासाठी तयार व्हा
आनंदाची बातमी माहितीपत्रकातून बायबल अभ्यास कसा सुरू करायचा
-
ठळक अक्षरांतील प्रश्न वाचा जेणेकरून घरमालकाचं लक्ष मुख्य मुद्द्यावर असेल.
-
त्यानंतरचा परिच्छेद वाचा.
-
तिरप्या अक्षरांतील शास्त्रवचनं वाचा आणि या वचनांतून ठळक अक्षरांत असलेल्या प्रश्नांची उत्तरं घरमालकाला मिळाली का, ते समजण्यासाठी योग्य प्रश्न विचारा.
-
प्रश्नाखाली आणखी एखादा परिच्छेद असेल तर वरील २ व ३ सूचनांनुसार करा. प्रश्नाला जुळणारा jw.org वर एखादा व्हिडिओ असेल तर चर्चेदरम्यान तो दाखवा.
-
घरमालकाला मुख्य मुद्दा समजला आहे किंवा नाही याची खातरी करण्यासाठी त्याला ठळक अक्षरांतील प्रश्नाचं उत्तर विचारा.