व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ इतिहास २९-३२

खऱ्या उपासनेत कष्ट घ्यावे लागतात

खऱ्या उपासनेत कष्ट घ्यावे लागतात

हिज्किया पूर्ण निश्चयानं खऱ्या उपासनेची पुनःस्थापना करतो

२९:१०-१७

  • इ.स.पू. ७४६-७१६

    हिज्कियाची कारकीर्द

  • निसान महिना

    • १-८ तारखेपर्यंत: मंदीर स्वच्छ केलं

    • ९-१६ तारखेपर्यंत: मंदिराचं पवित्रीकरण पूर्ण होतं

    • सर्व इस्राएल राष्ट्राला पश्‍चात्ताप करण्याची व खरी उपासना पुन्हा सुरू करण्याची वेळ सुरू झाली

  • इ.स.पू. ७४०

    शोमरोनाचा पाडाव

हिज्किया सर्व प्रामाणिक मनाच्या लोकांना उपासनेसाठी एकत्र येण्याचं आमंत्रण देतो

३०:५, ६, १०-१२

  • बैर-शेब्यापासून दानापर्यंत संपूर्ण देशात वल्हांडण सण साजरा करण्याविषयीची घोषणा करणारी पत्रे देण्यासाठी जासूद पाठवण्यात आले

  • काहींनी या व्यवस्थेची थट्टा केली पण बहुतेकांनी चांगला प्रतिसाद दिला