ख्रिस्ती जीवन
छळ होत असलेल्या ख्रिस्ती बांधवांसाठी प्रार्थना करायला विसरू नका
आपल्या सेवाकार्यात अडथळे आणण्यासाठी सैतान आपला छळ करेल अशी आधीच बायबलमध्ये भविष्यवाणी करण्यात आली होती. (योहा. १५:२०; प्रकटी. १२:१७) दुसऱ्या देशांमध्ये छळ होत असलेल्या आपल्या ख्रिस्ती बांधवांची आपण कशी मदत करू शकतो? आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. “नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.”—याको. ५:१६.
आपण कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करू शकतो? आपल्या बांधवांना आणि बहिणींना भीती वाटू नये म्हणून आणि धैर्य देण्यासाठी आपण यहोवाकडे प्रार्थना करू शकतो. (यश. ४१:१०-१३) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या प्रचार कार्याबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवावा, यासाठी देखील आपण प्रार्थना करू शकतो म्हणजे आपल्याला “शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण” करता येईल.—१ तीम. २:१, २.
जेव्हा पौलाचा आणि पेत्राचा छळ करण्यात आला, तेव्हा पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती बांधवांनी त्यांची नावं घेऊन प्रार्थना केली. (प्रे. कृत्ये १२:५; रोम. १५:३०, ३१) आज ज्यांचा छळ होत आहे, त्या सर्वांची नावं जरी आपल्याला माहीत नसली, तरी आपण त्यांच्या मंडळीचा किंवा देशाचा उल्लेख करून त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो.