यहोवा थकलेल्यांना बळ देतो
-
जमीनीपासून आणि समुद्रातून वर येणाऱ्या उष्ण हवेच्या आधारे, गरुड अनेक तास हवेत तरंगत राहू शकतो. उष्ण हवा कुठून येत आहे हे गरुडाला कळलं की तो तिथंच घिरट्या घालत राहतो. ही उष्ण हवा त्याला आणखी वर घेऊन जाते. गरुड एका विशिष्ट उंचीवर पोचला, की तो उष्ण हवेच्या दुसऱ्या ठिकाणावर जातो आणि हीच प्रक्रिया पुढे चालत राहते
-
गरुड ज्या सहजतेने आणि सुंदर रीतीने उडतो, त्यावरून आपण हे शिकू शकतो की, यहोवाने आपल्याला दिलेल्या बळामुळे आपण त्याची उपासना करू शकतो