३० जानेवारी–५ फेब्रुवारी
यशया ४३-४६
गीत ३३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवा खरी भविष्यवाणी करणारा देव आहे”: (१० मि.)
यश. ४४:२६-२८—जेरूसलेमची आणि मंदिराची पुनर्बांधणी होईल आणि बॅबिलॉनवर कोरेश नावाचा राजा विजय मिळवेल अशी भविष्यवाणी यहोवाने केली (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. ७१-७२ परि. २२-२३)
यश. ४५:१, २—बॅबिलॉन कसं काबीज केलं जाईल याबद्दल यहोवाने सविस्तर माहिती दिली (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. ७७-७८ परि. ४-६)
यश. ४५:३-६—बॅबिलॉन काबीज करण्यासाठी यहोवाने कोरेशला का निवडलं, हे त्याने सांगितलं (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. ७९-८० परि. ८-१०)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यश. ४३:१०-१२—इस्राएली लोक कशा प्रकारे यहोवासाठी साक्षीदारांचे राष्ट्र ठरणार होते? (टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. २१-२२, परि. १४-१६)
यश. ४३:२५—यहोवा आपली पापं कोणत्या मुख्य कारणामुळे पुसून टाकतो (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. ६० परि. २४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. ४६:१–१३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) kt पत्रिका पान १—शाळेतल्या किंवा कामावरच्या सोबत्याला अनौपचारिक रीतीने प्रचार करा.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) kt पत्रिका—बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओचाही समावेश करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १०८-१०९ परि. ८-९
ख्रिस्ती जीवन
बायबल देवाकडून असल्याची खात्री आपण का बाळगू शकतो?: (१५ मि.) बायबल देवाकडून असल्याची खात्री आपण का बाळगू शकतो? हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर पुढील प्रश्नांवर चर्चा करा: आपण या व्हिडिओचा वापर अनौपचारिक, सार्वजनिक आणि घरोघरचं प्रचारकार्य करताना कसं करू शकतो? हा व्हिडिओ दाखवल्याने तुम्हाला कोणते चांगले अनुभव आले?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १४ परि. १४-२२ पृ. १४३ वरील उजळणी प्रशनं
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४४ आणि प्रार्थना