जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका जानेवारी २०१८
चर्चेसाठी नमुने
कौटुंबिक समस्येसाठी असलेल्या मार्गदर्शनाच्या चर्चेसाठी नमुने.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे”
योहानचं राहणीमान साधं होतं आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. आजही साधं राहणीमान ठेवल्यामुळे, यहोवाच्या सेवेत जास्त सहभाग घेण्यासाठी आपल्याला मदत होते.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
डोंगरावरच्या उपदेशातले महत्त्वाचे धडे
आपली आध्यात्मिक गरज ओळखणं म्हणजे काय? आपण आध्यात्मिक अन्न घेण्याच्या रोजच्या सवयीमध्ये कशा प्रकारे सुधार करू शकतो?
ख्रिस्ती जीवन
आधी आपल्या भावाशी समेट कर—हे कसं करता येईल?
आपल्या बांधवासोबत शांती प्रस्थापित करणं आणि यहोवाची उपासना, या दोन्ही गोष्टी कशा प्रकारे संबंधित आहेत याबद्दल येशूने काय शिकवलं?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत राहा
प्रार्थना करताना आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे?
ख्रिस्ती जीवन
चिंता करत बसू नका
डोंगरावरच्या उपदेशात येशूने जेव्हा आपल्या शिष्यांना सांगितलं, की त्यांनी चिंता करण्याचं सोडून दिलं पाहिजे तेव्हा त्याचा काय अर्थ होता?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
येशूचं लोकांवर प्रेम होतं
येशूने लोकांना बरं केलं तेव्हा त्याने आपली शक्ती दाखवली. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, त्याने लोकांना बरं करून त्यांच्याबद्दल असलेलं महान प्रेम आणि दयाही दाखवली.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
येशूने तजेला दिला
जेव्हा आपण बाप्तिस्म्याच्या वेळी शिष्यत्वाचं जू घेतो, तेव्हा खरंतर आपण आव्हानात्मक कामं आणि जबाबदाऱ्या स्वीकारत असतो आणि हा आपल्यासाठी तजेला देणारा अनुभव आहे.