व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

चिंता करत बसू नका

चिंता करत बसू नका

डोंगरावर दिलेल्या उपदेशात येशूने म्हटलं: “आपल्या जिवाबद्दल . . . चिंता करण्याचं सोडून द्या.” (मत्त ६:२५) सैतानाच्या जगात राहत असल्यामुळे अपरिपूर्ण मानवांना कधीकधी चिंता वाटणं साहजिकच आहे. पण अवाजवी चिंता करण्याचं टाळलं पाहिजे, असं येशूने आपल्या शिष्यांना शिकवलं. (स्तो १३:२) आपण चिंता करू नये, असं येशूने का म्हटलं? कारण कोणत्याही गोष्टीबद्दल आपण अवाजवी चिंता करत बसलो; मग त्या रोजच्या गरजा का असेना, त्यामुळे आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. शिवाय, आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करणंही आपल्याला कठीण जाऊ शकतं. (मत्त ६:३३) येशूने त्यानंतर जे म्हटलं, त्यामुळे आपल्याला अनावश्‍यक चिंता टाळण्यासाठी मदत होईल.

मी कोणत्या गोष्टीची चिंता करण्याचं सोडून दिलं पाहिजे