“स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे”
-
योहानच्या पेहरावावरून हे स्पष्टपणे दिसून यायचं, की त्याचं राहणीमान साधं होतं आणि यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं
-
येशूसाठी मार्ग तयार करण्याचा एक खास बहुमान योहानला मिळाला होता आणि तो बहुमान इतर कोणत्याही त्यागापेक्षा मोठा होता
साधं राहणीमान ठेवल्यामुळे, यहोवाच्या सेवेत जास्त सहभाग घेण्यासाठी आपल्याला मदत होते आणि यामुळे जीवनात खूप समाधानही मिळतं. पुढील गोष्टी करण्याद्वारे आपण आपलं जीवन साधं ठेवू शकतो:
-
तुम्हाला कोणत्या गोष्टींची खरोखर गरज आहे, ते ओळखा
-
अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्याचं टाळा
-
व्यावहारिक बजेट बनवा
-
वापरात नसलेल्या वस्तू काढून टाका
-
कर्ज असल्यास ते फेडा
-
नोकरीसाठी खूप जास्त वेळ देण्याचं टाळा
साधं राहणीमान ठेवल्यामुळे कोणतं आध्यात्मिक ध्येय गाठणं मला शक्य होईल?