व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२२-२८ जानेवारी

मत्तय ८-९

२२-२८ जानेवारी
  • गीत २५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • येशूचं लोकांवर प्रेम होतं”: (१० मि.)

    • मत्त ८:१-३—येशूने कुष्ठरोग्याला दाखवलेली दया उल्लेखनीय होती (“त्याला स्पर्श केला,” “माझी इच्छा आहे” अभ्यासासाठी माहिती-मत्त ८:३, nwtsty)

    • मत्त ९:९-१३—इतरांनी तुच्छ लेखलेल्या लोकांवर येशूचं प्रेम होतं (“जेवायला बसणं,” “जकातदार” अभ्यासासाठी माहिती-मत्त ९:१०, nwtsty)

    • मत्त ९:३५-३८—थकलेला असतानाही येशूने लोकांबद्दल प्रेम असल्यामुळे, त्यांना आनंदाचा संदेश सांगितला आणि जास्त कामकरी पाठवावेत अशी देवाला प्रार्थनाही केली (“कळवळा आला” अभ्यासासाठी माहिती-मत्त ९:३६, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त ८:८-१०—सैन्यातल्या अधिकाऱ्‍याशी झालेल्या येशूच्या संभाषणावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०२ ८/१५ पृ. १३ परि. १६)

    • मत्त ९:१६, १७—यात दिलेल्या उदाहरणांवरून येशूला कोणता मुद्दा सांगायचा होता? (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. २८ परि. ६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त ८:१-१७

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत १९

  • देवानं येशूलाच प्रभू व ख्रिस्त बनवलं आहे”भाग १ (निवडक भाग): (१५ मि.) चर्चा. मत्तय ९:१८-२५ ही वचनं वाचून झाल्यावर आणि व्हिडिओचा निवडक भाग पाहिल्यावर पुढील प्रश्‍न विचारा:

    • येशूने कसं दाखवलं की त्याला आजारी स्त्री आणि याईर यांच्याबद्दल काळजी होती?

    • देवाच्या राज्यात जीवन कसं असेल याविषयी बायबलमध्ये भविष्यवाण्या दिल्या आहेत. त्यांबद्दल असलेल्या आपल्या दृष्टिकोनावर या अहवालामुळे कसा प्रभाव पडतो?

    • येशूने लोकांबद्दल दाखवलेल्या प्रेमाचं आपण कोणकोणत्या मार्गांनी अनुकरण करू शकतो?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १० परि. १६-२४

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ५० आणि प्रार्थना