येशूचं लोकांवर प्रेम होतं
येशूने गालीलच्या प्रदेशात केलेल्या सेवाकार्याची काही माहिती, मत्तय ८ आणि ९ या अध्यायांत देण्यात आली आहे. येशूने लोकांना बरं केलं तेव्हा त्याने आपली शक्ती दाखवली. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, त्याने लोकांना बरं करून त्यांच्याबद्दल असलेलं महान प्रेम आणि दयाही दाखवली.
-
येशूने एका कुष्ठरोग्याला बरं केलं.—मत्त ८:१-३
-
येशूने सैन्यातल्या एका अधिकाऱ्याच्या सेवकाला बरं केलं.—मत्त ८:५-१३
त्याने पेत्रच्या सासूला बरं केलं.—मत्त ८:१४, १५
त्याने लोकांमधून दुरात्म्यांना घालवून दिलं आणि त्यांना बरं केलं.—मत्त ८:१६, १७
-
येशूने लोकांमधून हिंसक दुरात्म्यांना काढून त्या दुरात्म्यांना डुकरांच्या एका कळपात जाऊ दिलं.—मत्त ८:२८-३२
-
येशूने लकवा झालेल्या माणसाला बरं केलं.—मत्त ९:१-८
येशूच्या कपड्यांना हात लावलेल्या स्त्रीला त्याने बरं केलं आणि याईरच्या मुलीला पुन्हा जिवंत केलं.—मत्त ९:१८-२६
येशूने आंधळ्यांना आणि एका मुक्या माणसाला बरं केलं.—मत्त ९:२७-३४
-
येशू नगरांत आणि गावांत फिरून सर्व प्रकारचे रोग व दुखणी बरी करायचा.—मत्त ९:३५, ३६
मी इतरांना प्रेम आणि दया कशा प्रकारे दाखवू शकतो?