ख्रिस्ती जीवन
आधी आपल्या भावाशी समेट कर—हे कसं करता येईल?
कल्पना करा, येशूच्या काळात तुम्ही गालील प्रदेशात राहत आहात. मांडवांचा सण साजरा करण्यासाठी तुम्ही यरुशलेममध्ये आला आहात. दूर असलेल्या ठिकाणांहून अर्पणं देण्यासाठी देवाचे उपासक तिथे आले आहेत. त्यामुळे शहर अगदी गजबजून गेलं आहे. तुम्हालासुद्धा यहोवाला अर्पण द्यायचं आहे आणि म्हणून तुम्ही सोबत एक प्राणीसुद्धा आणला आहे. आता अर्पण देण्यासाठी तुम्ही गर्दी असलेल्या गल्लीबोळ्यांतून मेहनत घेऊन मंदिरापर्यंत पोहोचता. जेव्हा तुम्ही तिथे पोहोचता तेव्हा अर्पण देण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी तुम्हाला दिसते. शेवटी, याजकाच्या हाती तुमचं अर्पण देण्याची वेळ येते आणि त्याच क्षणी तुमच्याविरुद्ध तक्रार असलेल्या बांधवाची तुम्हाला आठवण होते. तोसुद्धा तिथेच गर्दीत किंवा शहरात कुठंतरी असावा. अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे, हे येशू सांगतो. (मत्तय ५:२४ वाचा.) येशूने सांगितल्याप्रमाणे, तुम्ही आणि मन दुखावलेला बांधव कशा रीतीने आपसांत शांती प्रस्थापित कराल? खाली दिलेल्या चौकटीतल्या पर्यायांपैकी योग्य उत्तरावर खूण करा.
तुम्ही . . .
-
त्या बांधवाशी तेव्हाच जाऊन बोलाल जेव्हा तुम्हाला वाटतं की त्याच्याकडे नाराज होण्याचं योग्य कारण होतं
-
त्याची विचारसरणी सुधारण्याचा प्रयत्न कराल, कारण तुम्हाला वाटतं की तो जास्त संवेदनशील आहे आणि समस्यांचा सगळा दोष तो इतरांवर लावतो
-
त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकून घ्याल; ते पूर्णपणे समजत नसलं तरीही. तो दुखावला आहे किंवा अजाणतेत तुम्ही त्याला दुखावलं आहे म्हणून तुम्ही त्याची मनापासून माफी मागाल
तो बांधव . . .
-
मंडळीतल्या इतरांना सांगेल, की तुम्ही कशा प्रकारे त्याच्या भावना दुखावल्या आहेत
-
तुम्हाला घालूनपाडून बोलेल. घडलेल्या चुकीतली प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची तुम्हाला आठवण करून देईल आणि तुम्ही तुमची चूक कबूल करायला हवी अशी अपेक्षा करेल
-
हे ओळखेल, की तुमच्यात नम्रता आणि धैर्य असल्यामुळे तुम्ही त्याच्याशी बोलायला आला आहात आणि म्हणून तो तुम्हाला मनापासून क्षमा करेल
आज आपल्याला प्राण्यांची अर्पणं देण्याची गरज नाही. पण येशूने जे तत्त्व सांगितलं, त्यातून आपल्या बांधवासोबत शांती प्रस्थापित करणं आणि यहोवाची उपासना, या दोन्ही गोष्टी संबंधित आहेत हे कसं दिसून येतं?