डोंगरावरच्या उपदेशातले महत्त्वाचे धडे
आपल्या आध्यात्मिक गरजेची तुम्हाला जाणीव आहे का?
“जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात,” या वाक्यांशाचा मूळ अर्थ, “जे पवित्र आत्म्याची भीक मागतात” असा होतो. (मत्त ५:३; तळटीप) आपण देवाकडून आध्यात्मिक मदत मिळवण्यासाठी उत्सुक आहोत, हे आपण पुढील गोष्टी करण्याद्वारे दाखवू शकतो:
-
नियमितपणे बायबलचं वाचन करणं
-
सभांची तयारी करून त्यांना उपस्थित राहणं
-
आपली प्रकाशनं आणि आपल्या वेबसाईटवरची माहिती वाचण्यासाठी वेळ काढणं
-
दर महिन्याचा JW ब्रॉडकास्टिंगचा कार्यक्रम पाहणं
आध्यात्मिक अन्न घेण्याच्या रोजच्या सवयीमध्ये मी कशा प्रकारे सुधार करू शकतो?