देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
नियमशास्त्रातून यहोवाला गरीबांची काळजी आहे हे दिसून येतं
ज्यांच्याकडे जमिनीचा वाटा किंवा वारसा नाही आणि जे गरीब आहेत, त्यांना इस्राएल देशात मदत मिळत होती (अनु १४:२८, २९; इन्साइट-२ १११० ¶३)
एखाद्या इस्राएली व्यक्तीने कर्ज घेतलं असेल, तर शब्बाथाच्या वर्षी त्याचं कर्ज “माफ” केलं जायचं (अनु १५:१-३; इन्साइट-२ ८३३)
एखाद्या इस्राएली व्यक्तीने स्वतःला दास म्हणून विकलं असेल, तर त्याला सातव्या वर्षी, म्हणजे सुटकेच्या वर्षी मुक्त केलं जायचं. आणि मुक्त करताना त्याला त्याचा मालक रिकाम्या हाती पाठवत नव्हता (अनु १५:१२-१४; इन्साइट-२ ९७८ ¶६)
स्वतःला विचारा, ‘मी कोणत्या काही व्यावहारिक मार्गांनी गरजू भाऊ-बहिणींना मदत करू शकतो?’