देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
नियमशास्त्रातून यहोवाला प्राण्यांची काळजी आहे हे दिसून येतं
एखादा प्राणी अडचणीत दिसल्यावर इस्राएली लोकांनी त्याला मदत करायची होती (अनु २२:४; इन्साइट-१ ३७५-३७६)
इस्राएली लोकांनी पिल्लांना सांभाळणाऱ्या पक्षाला पकडायचं नव्हतं (अनु २२:६, ७; इन्साइट-१ ६२१ ¶१)
नांगरणी करण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्राण्यांना एकत्र जुंपायचं नव्हतं (अनु २२:१०; टेहळणी बुरूज०३ १०/१५ ३२ ¶१-२)
आपण प्राण्यांशी क्रूरतेने वागू नये किंवा फक्त खेळ म्हणून त्यांना मारू नये. तर त्यांच्याशी दयेनं वागावं अशी यहोवाची इच्छा आहे.—नीत १२:१०.