व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

हृदयापर्यंत पोहोचा

हृदयापर्यंत पोहोचा

आपण यहोवाच्या आज्ञा मनापासून पाळाव्यात असं त्याला वाटतं. (नीत ३:१) म्हणून, आपण शिकवताना विद्यार्थ्याच्या मनापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण हे कसं करता येईल?

विद्यार्थ्याला फक्‍त बायबल सत्यंच शिकवू नका, तर ती जीवनात लागू करायलाही शिकवा, म्हणजे त्याला यहोवासोबत जवळचं नातं जोडता येईल. विद्यार्थ्याला बायबलच्या तत्त्वांमधून यहोवाचं प्रेम, त्याचा चांगुलपणा आणि त्याचं नीतिमत्त्व कसं दिसून येतं, हे समजून घ्यायला मदत करा. विद्यार्थ्याला तो शिकत असलेल्या गोष्टींबद्दल कसं वाटतं, हे समजून घेण्यासाठी प्रश्‍नांचा कुशलपणे वापर करा. चुकीचा दृष्टिकोन किंवा वाईट सवयी सोडून दिल्यामुळे त्याला व्यक्‍तिगतपणे कसा फायदा होईल, याबद्दल त्याच्यासोबत तर्क करा. तुमच्या विद्यार्थ्याचं यहोवावर मनापासून प्रेम आहे, हे पाहून सेवाकार्यातला तुमचा आनंद आणखी वाढेल.

‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोहोचून,   हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • निताने जेडला, “काय वाटतं तुला, तू विचार केलास का त्याबद्दल,” असा प्रश्‍न का विचारला?

  • यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळेच त्याने आपल्याला त्याची तत्त्वं दिली आहेत, हे निताने जेडला कसं पटवून दिलं?

  • आपण विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोचायचा प्रयत्न केला, तर त्यामुळे प्रगती करायला त्याला प्रोत्साहन मिळेल

    यहोवावर असलेलं आपलं प्रेम कसं व्यक्‍त करता येईल, यावर विचार करायला निताने जेडला कशी मदत केली?