सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा
सहानुभूती दाखवा
एखाद्याचे विचार, त्याच्या भावना, तो कोणत्या तत्त्वांनुसार जगतोय आणि त्याच्या गरजा काय आहेत, हे समजून घेण्याची क्षमता म्हणजे सहानुभूती. इतरांना मनापासून मदत करण्याच्या आपल्या इच्छेतून सहानुभूती दिसून येते आणि इतरांनाही ती सहजपणे जाणवते. सेवाकार्यात जेव्हा आपण लोकांना सहानुभूती दाखवतो तेव्हा त्यातून त्यांना यहोवाचं प्रेम आणि काळजी दिसून येते. आणि त्यामुळे ते यहोवाकडे आकर्षित होतात. —फिलि २:४.
सहानुभूती हे शिकवण्यासाठी लागणारं फक्त एक कौशल्य नाही. तर आपण इतरांचं ज्या प्रकारे ऐकतो, त्यांच्याशी बोलतो त्यातून दिसून येणारा हा एक गुण आहे. तसंच आपली प्रतिक्रीया आणि आपले हावभाव, यातूनही सहानुभूती दिसून येते. आपण जेव्हा इतरांना काय आवडतं, ते कोणत्या गोष्टी मानतात आणि त्याची परिस्थिती कशी आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचं दाखवत असतो. आपण इतरांवर कोणताही दबाव न आणता त्यांना काही व्यावहारिक गोष्टी सुचवतो आणि त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो. ते जेव्हा आपली मदत घ्यायला तयार होतात, तेव्हा सेवाकार्यातला आपला आनंद आणखी वाढतो.
‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—सहानुभूती दाखवून’ हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
जेड उशीरा आली तेव्हा निताने तिला सहानुभूती कशी दाखवली?
-
थकून गेल्यामुळे स्टडी करायचा मूड नाही, असं जेव्हा जेडने सांगितलं, तेव्हा निताने सहानुभूती कशी दाखवली?
-
सगळ्या गोष्टी सुव्यवस्थितपणे करायला जमत नाहीत, असं जेडने सांगितल्यावर निताने तिला सहानुभूती कशी दाखवली?