देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
नियमशास्त्रातून यहोवाला स्त्रियांची काळजी होती हे दिसून येतं
नुकतंच लग्न झालेल्या स्त्रीला, आपल्या पतीला युद्धात गमावण्याची भीती नव्हती, कारण त्याने सैन्यात जाऊ नये म्हणून त्याला वर्षभर सूट दिली जायची (अनु २४:५; इन्साइट-२ ११९६ ¶४)
विधवांच्या गरजा पुरवल्या जायच्या (अनु २४:१९-२१; इन्साइट-१ ९६३ ¶२)
मुलं नसलेल्या विधवांसाठी नियमशास्त्रात तरतूद करण्यात आली होती (अनु २५:५, ६; टेहळणी बुरूज११-E ३/१ २३)
स्वतःला विचारा, ‘माझ्या कुटुंबातल्या आणि मंडळीतल्या स्त्रियांना आदर दाखवण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी मी काय करू शकतो?’