ख्रिस्ती जीवन
चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर कसा कराल?
चर्चेसाठी असलेले नमुने सहसा खूप विचार करून तयार केले जातात आणि बऱ्याच प्रचारकांना त्यांचा वापर केल्यामुळे प्रचारकार्यात चांगले परिणाम दिसून आले आहेत. पण, जगातल्या सगळ्याच भागांत परिस्थिती सारखी नसते. त्यामुळे सेवाकार्य करताना प्रचारक आपल्या क्षेत्रातली परिस्थिती लक्षात घेऊन संभाषण सुरू करण्यासाठी वेगळी पद्धत किंवा वेगळा विषय निवडू शकतात. पण खास मोहीम असते त्या वेळी सगळ्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन केलं पाहिजे. राज्याचा आनंदाचा संदेश घोषित करण्याची जी जबाबदारी येशूने आपल्यावर सोपवली आहे ती पार पाडणं हेच आपलं ध्येय आहे.—मत्त २४:१४.
पण विद्यार्थी भाग सादर करण्याच्या बाबतीत काय? याबद्दल जून २०२० च्या कार्यपुस्तिकेत पान ८ वर ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यात आता बदल करण्यात आला आहे. तो बदल पुढीलप्रमाणे आहे: विद्यार्थी भाग सादर करताना, प्रचारकांनी ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका यात असलेल्या नमुन्यांचा विषय वापरला पाहिजे. पण ते आपल्या क्षेत्रातल्या परिस्थितीप्रमाणे त्या विषयावर आधारित एखादा वेगळा प्रश्न, वचन, पुढच्या भेटीसाठी असलेला प्रश्न किंवा सेटिंग वापरू शकतात. काही वेळा तुमच्या विद्यार्थी भागासोबत एखादी विशिष्ट सूचना दिलेली असेल. अशा वेळी तुम्ही त्या सूचनेप्रमाणे तो भाग सादर केला पाहिजे.