ख्रिस्ती जीवन | येत्या सेवा वर्षासाठी ध्येयं ठेवा
जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करा
आपली सेवा वाढवण्यासाठी, राहतं ठिकाण सोडून एका नवीन ठिकाणी जायला भक्कम विश्वासाची गरज आहे. (इब्री ११:८-१०) जर तुम्हीसुद्धा जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करायच्या विचारात असाल, तर तुमच्या मंडळीतल्या वडिलांशी चर्चा करा. कोणत्या ठिकाणी जावं आणि तिथे जाऊन राहणं आपल्याला खरंच शक्य होईल का हे ठरवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? यासाठी जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याबद्दल माहिती देणारे लेख आणि व्हिडिओ पाहा. जे आधीच दुसऱ्या मंडळीत जाऊन सेवा करत आहेत त्यांच्याशी चर्चा करा. (नीत १५:२२) यहोवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करा. (याक १:५) तुम्ही जिथे जायचा विचार करत आहात त्या ठिकाणाबद्दल माहिती काढा. आणि शक्य असेल तर हा निर्णय घेण्याआधी काही दिवसांसाठी तिथे जाऊन राहा.
तुमच्यासमोर असलेल्या सेवेच्या दारात विश्वासाने प्रवेश करा—गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करा हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या:
-
यहोवाची जास्त प्रमाणात सेवा करण्यासाठी या व्हिडिओत दाखवलेल्या भावाला त्याच्या विचारसरणीत कोणते बदल करावे लागले, आणि यासाठी त्याला कशामुळे मदत झाली?