ख्रिस्ती जीवन | येत्या सेवा वर्षासाठी ध्येयं ठेवा
यहोवाच्या उपासनेशी संबंधित बांधकाम प्रकल्पांत मदत करा
यहोवाच्या उपासनेसाठी वापरल्या जाणाऱ्या इमारतींचं बांधकाम करणं ही एक पवित्र सेवा आहे. (निर्ग ३६:१) तुम्ही अधूनमधून जवळपासच्या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांत मदत करायला जाऊ शकता का? यासाठी तुम्हाला लोकल डिझाईन/कंस्ट्रक्शन व्हॉलंटियर ॲप्लिकेशन (DC-50) हा अर्ज भरावा लागेल. किंवा मग, लांबच्या ठिकाणी चाललेल्या प्रकल्पांत बऱ्याच आठवड्यांसाठी किंवा महिन्यांसाठी मदत करायला जायची तुमची इच्छा असेल, तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर व्हॉलंटियर प्रोग्राम (A-19) हा अर्ज भरू शकता. बांधकाम प्रकल्पांत स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी या कामाचा अनुभव असणं गरजेचं नाही.—नहे २:१, ४, ५.
तुमच्यासमोर असलेल्या सेवेच्या दारात विश्वासाने प्रवेश करा—संघटनेच्या बांधकाम प्रकल्पात मदत करा हा व्हिडिओ पाहा आणि मग खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
साराला कशाची चिंता वाटत होती आणि तिला कशामुळे मदत झाली?