व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

सप्टेंबरमध्ये बायबल अभ्यास सुरू करायची खास मोहीम

सप्टेंबरमध्ये बायबल अभ्यास सुरू करायची खास मोहीम

सप्टेंबर महिन्यात आपण कायम आनंद घ्या!  माहितीपत्रक वापरून प्रत्येक कुटुंबासोबत बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करणार आहोत. प्रचारक या महिन्यात ३० तासांची सहायक पायनियर सेवा करायचं निवडू शकतात. या खास मोहिमेत आपण नेमकं काय करणार आहोत?

  • पहिल्या भेटीत: घरमालकाबद्दल आपुलकी दाखवून त्यांच्यासोबत सहज आणि स्वाभाविकपणे बोला. (फिलि २:४). असं बऱ्‍याच वेळा त्यांच्याशी बोलल्यानंतर, हळूहळू बायबलच्या विषयांबद्दल सांगायचा प्रयत्न करा. त्या व्यक्‍तीला खरंच आवड असेल आणि त्याला पुढे चर्चा करायची इच्छा असेल, तर बायबल अभ्यासाबद्दल विचारा. पूर्वी ज्यांनी आवड दाखवली होती किंवा ज्यांना तुम्ही पुनर्भेटी दिल्या होत्या, त्यांनासुद्धा पुन्हा भेटायचा प्रयत्न करा. आधी त्यांनी अभ्यास करायची इच्छा दाखवली नसेल, तरी आता या नवीन माहितीपत्रकातून आणि नवीन पद्धतीने अभ्यास करायला ते कदाचित तयार होतील. प्रचारकार्यात ज्यांची प्रत्यक्ष भेट झालेली नाही त्यांच्या घरी या माहितीपत्रकाची प्रत सोडू नका किंवा ज्यांनी आवड दाखवली नाही अशांना हे माहितीपत्रक पत्रासोबत पाठवू नका. मंडळीची सेवा समिती या महिन्यात जास्त क्षेत्र सेवेच्या सभांची योजना करू शकते.

  • इतर वेळी: तुमच्या मंडळीत ट्रॉलीचा वापर केला जात असेल तर कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक त्यावर ठेवा. आवड दाखवणारे लोक हे माहितीपत्रक घेतात तेव्हा त्यांना मोफत बायबल अभ्यासाबद्दलही सांगा. मंडळीचे सेवा पर्यवेक्षक व्यापार क्षेत्रात कार्य करण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रचार करणाऱ्‍या काही प्रचारकांना निवडू शकतात. कामावरच्या ठिकाणी किंवा अनौपचारिक पद्धतीने प्रचार करताना भेटलेल्या लोकांनी जर खरंच आवड दाखवली असेल, तर तुम्ही त्यांना बायबल अभ्यासाविषयी सांगू शकता.

येशूने “शिष्य करा” आणि लोकांना “शिकवा” अशी आपल्याला आज्ञा दिली आहे. (मत्त २८:१९, २०) ही आज्ञा पूर्ण करण्यासाठी कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक वापरून केल्या जाणाऱ्‍या या खास मोहिमेमुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल.