देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवाच्या सेवेसाठी तुम्ही त्याग करत आहात का?
दावीदला अरवना याच्या खळ्यावर एक वेदी बांधायची आज्ञा देण्यात आली होती (२शमु २४:१८)
अरवना उदारपणे आपली जमीन आणि अर्पणांसाठी लागणारी गुरंढोरं द्यायला तयार होता (२शमु २४:२१-२३)
पण दावीदला अशी अर्पणं द्यायची नव्हती, ज्यांसाठी त्याने स्वतः कोणताच त्याग केला नव्हता (२शमु २४:२४, २५; इन्साइट-१ १४६)
जेव्हा आपण राज्याच्या कामासाठी त्याग करतो, म्हणजेच आपला वेळ, शक्ती आणि साधनसंपत्ती स्वेच्छेने खर्च करतो तेव्हा यहोवाला आनंद होतो. (टेहळणी बुरूज१२ १/१५ १८ ¶८) यहोवाला आणखी जास्त प्रमाणात “स्तुतीचं बलिदान” देण्यासाठी तुम्हाला कोणती ध्येयं ठेवता येतील?—इब्री १३:१५.