ख्रिस्ती जीवन
यहोवा तुमच्या प्रार्थनांचं उत्तर कसं देतो हे पाहायचा तुम्ही प्रयत्न करत आहात का?
बायबलमध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत, जी दाखवून देतात की यहोवाने त्याच्या सेवकांच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं. या सेवकांच्या समस्या त्याने ऐकल्या आणि त्यांना मदत पुरवली, तेव्हा त्यांचा विश्वास नक्कीच मजबूत झाला असेल. म्हणून आपणही प्रार्थना करतो तेव्हा ठरावीक किंवा नेमक्या गोष्टींबद्दल त्याला सांगितलं पाहिजे. आणि मग यहोवा आपल्याला त्याचं उत्तर कसं देईल हे पाहिलं पाहिजे. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की कदाचित आपण अपेक्षा केली नसेल अशा पद्धतीने तो आपल्याला उत्तर देईल किंवा मागितलेल्या गोष्टींपेक्षा कित्येक पटींनी जास्त प्रमाणात देईल. (२कर १२:७-९; इफि ३:२०) तर मग, यहोवा कोणत्या मार्गाने आपल्याला प्रार्थनांचं उत्तर देतो?
-
तो समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक बळ देतो.—फिलि ४:१३
-
योग्य निर्णय घेण्यासाठी तो आपल्याला बुद्धी देतो.—याक १:५
-
एखादी गोष्ट करण्यासाठी तो इच्छा आणि ताकद देतो.—फिलि २:१३
-
आपण चिंतेत असतो तेव्हा तो आपल्याला शांत मन देतो.—फिलि ४:६, ७
-
तो इतरांकडून आपल्याला व्यावहारिक मदत पुरवतो, तसंच सांत्वन आणि प्रोत्साहनही देतो.—१यो ३:१७, १८
-
आपण ज्यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यांना तो मदत करतो.—प्रेका १२:५, ११
यहोवा ‘प्रार्थना ऐकणारा’ देव आहे हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
आरोग्याच्या समस्येमुळे जर आपल्याला हवं तितकं करता येत नसेल, तर ब्रदर शिमीझू यांच्या अनुभवातून आपल्याला कसं प्रोत्साहन मिळतं?
-
आपण ब्रदर शिमीझू यांच्या उदाहरणाचं अनुकरण कशा प्रकारे करू शकतो?