देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
शलमोनने सर्वांसमोर नम्रपणे आणि मनापासून केलेली प्रार्थना
मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी शलमोनने सर्व लोकांसमोर यहोवाला अगदी मनापासून प्रार्थना केली (१रा ८:२२; टेहळणी बुरूज०९ ११/१५ ९ ¶९-१०)
शलमोनने स्वतःकडे लक्ष वेधलं नाही, तर त्याने यहोवाची स्तुती केली (१रा ८:२३, २४)
शलमोनने खूप नम्रपणे यहोवाला प्रार्थना केली (१रा ८:२७; टेहळणी बुरूज९९ १/१५ १७ ¶७-८)
शलमोनने प्रार्थनेच्या बाबतीत आपल्यासाठी खूप चांगलं उदाहरण मांडलं आहे, खासकरून जे इतरांच्या वतीने प्रार्थना करतात त्यांच्यासाठी. आपण आपल्या प्रार्थनेने लोकांना प्रभावित करायचा प्रयत्न करण्याऐवजी, ती ऐकून यहोवाला कसं वाटेल, याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.