ख्रिस्ती जीवन | येत्या सेवा वर्षासाठी ध्येयं ठेवा
पायनियर सेवा
आपण जेव्हा यहोवाच्या सेवेत ध्येयं ठेवतो तेव्हा आपण आपल्या शक्तीचा चांगल्या प्रकारे वापर करत असतो. (१कर ९:२६) या जगाचा अंत होण्यासाठी फार कमी वेळ उरला आहे. आणि ध्येयं ठेवल्यामुळे आपल्याला या वेळेचा सगळ्यात चांगला उपयोग करणं शक्य होतं. (इफि ५:१५, १६) दरवर्षी १ सप्टेंबर पासून नवीन सेवा वर्ष सुरू होतं आणि हे पुढच्या वर्षीच्या ३१ ऑगस्ट पर्यंत असतं. प्रत्येक नवीन सेवा वर्ष सुरू होतं, तेव्हा आपल्याला काही नवीन ध्येयं ठेवायची संधी असते. तर मग येत्या सेवा वर्षासाठी कोणती ध्येयं ठेवता येतील, याबद्दल तुमच्या कौटुंबिक उपासनेत चर्चा करायला काय हरकत आहे? यासाठी तुम्हाला मदत व्हावी म्हणून या कार्यपुस्तिकेत बरीच वेगवेगळी ध्येयं सुचवलेली आहेत. त्यांवर तुम्ही प्रार्थनापूर्वक विचार करू शकता.—याक १:५.
उदाहरणार्थ, कुटुंबातल्या सगळ्यांच्या सहकार्याने तुमच्या कुटुंबातला एक सदस्य पायनियर सेवेचा अर्ज भरू शकेल का? जर तास पूर्ण करण्याबद्दल तुम्हाला चिंता वाटत असेल, तर तुम्ही तुमच्यासारखीच परिस्थिती असलेल्या एखाद्या पायनियरसोबत बोलू शकता. (नीत १५:२२) हवं असेल तर तुमच्या कौटुंबिक उपासनेत तुम्ही अशा एका पायनियरची मुलाखतसुद्धा घेऊ शकता. मग तुमच्यासाठी व्यावहारिक ठरतील असे काही आराखडे तयार करा. जर तुम्ही आधी पायनियर सेवा केली असेल तर आता ती पुन्हा सुरू करता येईल का, यावर विचार करा.
येत्या सेवा वर्षात तुमच्या कुटुंबातले काही जण एक किंवा त्यापेक्षा जास्त महिने सहायक पायनियर सेवा करू शकतात का? जर तब्येतीमुळे तुम्हाला जास्त वेळ प्रचारकार्य करणं जमत नसेल, तर तुम्ही दररोज थोडा-थोडा वेळ सेवा करून सहायक पायनियर सेवेचं ध्येय पूर्ण करू शकता. कदाचित नोकरी करत असल्यामुळे किंवा शाळा-कॉलेजात शिकत असल्यामुळे तुम्हाला आठवड्यादरम्यान जास्त वेळ प्रचारकार्य करणं शक्य नसेल. असं असेल, तर तुम्ही असा एखादा महिना निवडू शकता ज्यात एखादी सुट्टी आहे किंवा पाच शनिवार-रविवार आहेत. येत्या सेवा वर्षासाठी कुटुंब मिळून कोणती ध्येयं ठेवता येतील यावर विचार करा. तुम्ही कोणत्या महिन्यांत सहायक पायनियर सेवा करणार आहात ते कॅलेंडरवर लिहून ठेवा आणि त्यासाठी एक आराखडाही तयार करा.—नीत २१:५.
धैर्यवान . . . पायनियर हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या:
-
व्हिडिओत दाखवलेल्या बहिणीची यहोवाने कशी काळजी घेतली? आणि यावरून आपण काय शिकतो?