व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

एज्रा ज्या प्रकारे वागला त्यामुळे यहोवाचा गौरव झाला

एज्रा ज्या प्रकारे वागला त्यामुळे यहोवाचा गौरव झाला

एज्राने मन लावून देवाचं वचन वाचलं. यामुळे त्याच्या मनावर इतका प्रभाव पडला, की तो त्याप्रमाणे वागला (एज ७:१०; टेहळणी बुरूज०० १०/१ १४ ¶८)

एज्रामुळे लोकांना देवाची बुद्धी दिसून आली (एज ७:२५; ऑल स्क्रिप्चर्स ७५ ¶५)

एज्राने स्वतःला देवासमोर नम्र केलं. त्यामुळे त्याला खातरी होती, की यहोवा त्याचं मार्गदर्शन आणि संरक्षण करेल (एज ८:२१-२३; टेहळणी बुरूज९२ ६/१ ३० ¶४)

एज्राकडे देवाकडून मिळालेली बुद्धी आहे, हे समजल्यामुळे राजाने त्याच्यावर मोठ्या जबाबदाऱ्‍या सोपवल्या. एज्रासारखंच आपणसुद्धा आपल्या वागण्यातून यहोवाचा गौरव करू शकतो.

स्वतःला विचारा, ‘मी देवाच्या स्तरांप्रमाणे वागतो हे सत्यात नसलेल्या लोकांनाही दिसून येतं का, आणि त्यामुळे ते माझा आदर करतात का?’