ख्रिस्ती जीवन
तुमच्या कुटुंबातला आनंद टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता
सगळी कुटुंबं आनंदी असावीत असं यहोवाला वाटतं. (स्तो १२७:३-५; उप ९:९; ११:९) पण जीवनातल्या चिंतांमुळे आणि कुटुंबातल्या लोकांच्या चुकांमुळे हा आनंद नाहीसा होऊ शकतो. मग कुटुंबातला आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जण काय करू शकतो?
एक पती आपल्या पत्नीचा आदर करतो. (१पेत्र ३:७) तो तिला वेळ देतो. तो तिच्याकडून खूप जास्त अपेक्षा करत नाही. तसंच त्याच्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी ती जे काही करते त्याबद्दल त्याला कदर असल्याचं तो दाखवतो. (कल ३:१५) तो तिच्याबद्दल असलेलं आपलं प्रेम व्यक्त करतो आणि तिची प्रशंसा करतो.—नीत ३१:२८, ३१.
पत्नी वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या पतीला साथ देते. (नीत ३१:१२) ती त्याच्या अधीन राहते आणि त्याला सहकार्य करते. (कल ३:१८) ती त्याच्याशी प्रेमाने बोलते आणि त्याच्याबद्दल इतरांशी चांगलं बोलते.—नीत ३१:२६.
पालक आपल्या मुलांना वेळ देतात. (अनु ६:६, ७) मुलांवर असलेलं प्रेम ते शब्दांत व्यक्त करतात. (मत्त ३:१७) मुलांना शिस्त लावतानाही ते प्रेम आणि समंजसपणा दाखवतात.—इफि ६:४.
मुलं आपल्या आईवडिलांचा आदर करतात आणि त्यांचं ऐकतात. (नीत २३:२२) ते आपल्या पालकांसमोर आपल्या मनातले विचार आणि भावना मनमोकळेपणाने व्यक्त करतात. आईवडील शिस्त लावतात तेव्हाही ते त्यांचा आदर करतात आणि त्यांचं ऐकतात—नीत १९:२०.
आपलं कुटुंब आनंदी बनवा हा व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तरं द्या:
कुटुंबातला आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने काय केलं?